Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 16:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही स्वत:ला लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंत:करणे ओळखतो; कारण माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही स्वतःला लोकांसमोर नीतिमान म्हणून मिरवता, पण देव तुमची अंतःकरणे ओळखतो. जे लोकांस त्यांच्या दृष्टीत महान वाटते ते देवाच्या नजरेमध्ये अमंगळ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 त्याने त्यांना म्हटले, तुम्ही स्वतःला लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखतो. माणसाला जे मौल्यवान वाटते ते देवाच्या दृष्टीने तिरस्करणीय आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही स्वतःस दुसर्‍यांच्या दृष्टीने नीतिमान ठरविणारे आहात, परंतु परमेश्वर तुमचे हृदय जाणून आहे. लोक ज्याला महत्त्व देतात त्या गोष्टी परमेश्वराच्या दृष्टीने तुच्छ आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 16:15
40 Iomraidhean Croise  

माझ्या देवा, मला ठाऊक आहे की, तुला हृदयाची पारख आहे; सरळता तुला पसंत आहे; मी तर आपल्या सरळ हृदयाने ह्या सर्व वस्तू तुला आनंदाने समर्पित केल्या आहेत; तुझे लोक जे येथे हजर आहेत त्यांनी स्वेच्छेने तुला अर्पणे केली आहेत हे पाहून मला मोठा आनंद वाटत आहे.


ती तू स्वर्गातील आपल्या निवासस्थानातून ऐक, त्यांना क्षमा कर; प्रत्येकाचे मन ओळखून त्याच्या सर्व वर्तनाप्रमाणे त्याला फळ दे; कारण सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस;


कारण दुर्जन आपल्या मनातील हावेची शेखी मिरवतो; लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो.


जे अभिमानी आहेत त्यांची, व त्यांचे बोलणे ज्यांना पसंत पडते अशा त्यांच्या अनुयायांचीही हीच गत आहे. (सेला)


तो जिवंत असता आपल्या जिवाला धन्य समजून म्हणे, “तू आपले बरे करून घेतलेस म्हणजे लोक तुझी स्तुती करतील,”


दुष्टाची दुष्टाई नष्ट होवो, नीतिमानाला तू खंबीर कर; न्यायी देव मने व अंतःकरणे पारखणारा आहे.


प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो; त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो.


दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरवशाचा मनुष्य कोणास मिळतो?


मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण अंत:करणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे.


“प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो.”


आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो; दुराचारी संपन्न झाले आहेत; त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा निभाव लागला आहे.”’


आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात; ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात;


तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.


ह्यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणांपुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.


तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका; कारण लोकांनी आपणांस पाहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.


परंतु स्वतःस नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण?”


परंतु प्रभूने त्याला म्हटले, “तुम्ही परूशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता; पण तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा ह्यांनी भरला आहे.


परूश्याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो.


मी तुम्हांला सांगतो, त्या दुसर्‍यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”


तो म्हणाला, “मी आपल्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळत आलो आहे.”


आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वत:विषयी भरवसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला, तो असा :


मग ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यात धरून सुभेदाराच्या तावडीत व अधिकारात आणावे म्हणून त्यांनी नीतिमान असल्याची बतावणी केलेले हेर त्याच्याकडे पाठवले.


ते विधवांची घरे गिळंकृत करतात आणि ढोंगाने लांबलचक प्रार्थना करतात; त्यांना अधिक शिक्षा होईल.”


शिवाय, मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला गरज नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते.


तिसर्‍यांदा तो त्याला म्हणाला, “योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय?” “माझ्यावर प्रेम करतोस काय?” असे तिसर्‍यांदा त्याला म्हटले, म्हणून पेत्र दु:खी होऊन त्याला म्हणाला, “प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे; मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे.” येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार.


(त्याने आपल्या दुष्टाईच्या मजुरीने शेत विकत घेतले; तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली.


मग त्यांनी अशी प्रार्थना केली, “हे सर्वांची हृदये जाणणार्‍या प्रभू,


आणि हृदये जाणणार्‍या देवाने जसा आपल्याला तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली.


म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही; कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्त्वाची प्राप्ती


आणि अंतर्यामे पारखणार्‍याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो.


म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका; तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील; आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.


तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंत:करणातील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा असावी.


तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी3 नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


मी तिच्या मुलाबाळांना जिवे मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी ‘मने व अंत:करणे ह्यांची पारख करणारा’ आहे आणि तुम्हा ‘प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन.’


पण परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे; मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan