Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 15:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 पण बापाने आपल्या दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 परंतु पिता आपल्या नोकरांस म्हणाला, त्वरा करा, चांगला झगा आणून त्यास घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 वडिलांनी दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 “परंतु त्याच्या वडिलांनी मात्र आपल्या चाकरांना आज्ञा केली, ‘त्वरा करा, सर्वात उत्तम झगा आणून त्याला घाला. त्याचप्रमाणे त्याच्या बोटात अंगठी घाला आणि पायात पायतण घाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 15:22
30 Iomraidhean Croise  

मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेववली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली;


तेव्हा राजाने आपली मुद्रा आपल्या बोटातून काढून यहूद्यांचा शत्रू जो अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याला दिली.


हामानाकडून काढून घेतलेली मुद्रा राजाने मर्दखयास दिली. एस्तेरने मर्दखयास हामानाच्या घराचा कारभारी नेमले.


मी तिच्या याजकांना उद्धाराने मंडित करीन; तिच्यातील भक्त मोठा आनंदघोष करतील.


तुझे याजक नीतिमत्त्वाने भूषित होवोत; तुझे भक्त आनंदघोष करोत;


तो माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतो, आणि उंच जागांवर माझी स्थापना करतो.


राजकन्या आपल्या अंतःपुरात अगदी ऐश्वर्यमंडित आहे; तिची वस्त्रे भरजरी आहेत.


हे राजकन्ये, तुझे पादत्राणयुक्त पाय किती सुंदर आहेत! कुशल कारागिराच्या हातांनी घडवलेल्या रत्नहारांसारख्या तुझ्या जांघा गोल आहेत.


मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्लासतो; कारण जसा नवरा शेलापागोटे लेऊन स्वत:ला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकारांनी स्वत:ला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत; मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.


मुलगा त्याला म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे; आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही.’


आणि पुष्ट वासरू आणून कापा; आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू;


तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा, आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.


हे देवाचे नीतिमत्त्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी आहे; त्यात भेदभाव नाही.


कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण “अब्बा! बापा!” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे.


कारण तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे.


शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा,


तुझे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत; तुझे सामर्थ्य आयुष्यभर कायम राहो.’


तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे;” ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत.


आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त ‘राखलेल्या मान्न्यातून मी देईन’ आणि त्याला मी पांढरा खडा देईन; त्या खड्यावर ‘नवे नाव’ लिहिलेले असेल, ते तो खडा घेणार्‍याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही.


म्हणून मी तुला मसलत देतो की, श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे; तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसायला शुभ्र वस्त्रे विकत घे; आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे.


तेव्हा त्या प्रत्येकाला एकेक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना असे सांगण्यात आले की, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या.


ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्‍यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan