Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 15:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा परूशी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करू लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 परुशी व शास्त्री अशी कुरकुर करू लागले की, हा पापी लोकांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 हे पाहून परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक तक्रार करू लागले, “येशू पापी लोकांचे स्वागत करतात आणि त्यांच्या पंक्तीस बसून जेवतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 15:2
12 Iomraidhean Croise  

मनुष्याचा पुत्र खातपीत आला; तर त्याच्याविषयी म्हणतात, ‘पाहा, खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र!’ परंतु ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते.”


हे पाहून परूशी त्याच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?”


मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला :


हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, “पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे.”


तेव्हा परूशी व त्यांच्यातील शास्त्री हे त्याच्या शिष्यांविरुद्ध कुरकुर करत त्यांना म्हणाले, “जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर तुम्ही का खातापिता?”


मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे, आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाड व दारुडा, जकातदारांचा व पातक्यांचा मित्र!


तेव्हा ज्या परूश्याने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, “हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते.”


“सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही जेवलात.”


कारण याकोबाकडील कित्येक जण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीस बसत असे; परंतु ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांना भिऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला.


ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे; त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan