लूककृत शुभवर्तमान 14:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधन्याला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, ‘नगराच्या रस्त्यांत व गल्ल्यांत लवकर जा, आणि दरिद्री, अपंग, आंधळे व लंगडे ह्यांना इकडे घेऊन ये.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तो नोकर परत आला व त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, ‘बाहेर रस्त्यावर आणि नगरातल्या गल्ल्यांमध्ये लवकर जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!’ Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वृत्त सांगितले. घरधन्याला राग आला व तो रागाने आपल्या दासाला म्हणाला, ‘नगराच्या रस्त्यांवर व गल्ल्यांत जा; तेथील गरीब, व्यंग, आंधळे व लंगडे ह्यांना इकडे घेऊन ये.’ Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “शेवटी दास आपल्या धन्याकडे परत आला आणि त्याला सर्व सांगितले. त्यावेळी धनी खूप रागावला व आपल्या दासाला आदेश दिला, ‘तू शहरातील रस्त्यांत व गल्ल्याबोळात जा आणि भिकारी, लुळेपांगळे आणि आंधळे सापडतील, त्यांना आण.’ Faic an caibideil |