Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 14:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, अपंग, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण करा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 परंतु तुम्ही मेजवानी द्याल, तेव्हा गरीब, लुळे, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण द्या

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तुम्ही मेजवानी देता, तेव्हा गोरगरीब, लुळेपांगळे आणि आंधळे अशांना आमंत्रण द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 14:13
34 Iomraidhean Croise  

मग त्याने सर्व प्रजेला म्हणजे इस्राएलाच्या समुदायातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकेक भाकर, मांसाचा एकेक तुकडा, खिसमिसांची एकेक ढेप अशी वाटून दिली. मग सर्व लोक घरोघर गेले.


यहूदाचा राजा हिज्कीया ह्याने अर्पणासाठी मंडळीला एक हजार गोर्‍हे आणि सात हजार मेंढरे दिली; आणि सरदारांनी मंडळीला एक हजार गोर्‍हे व दहा हजार मेंढरे दिली; त्या वेळी पुष्कळ याजकांनी आपणांस पवित्र केले.


तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “जा, मिष्टान्नाचे सेवन करा; गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.”


नंतर सर्व लोक खाणेपिणे करण्यास, एकमेकांना ताटे वाढून पाठवण्यास व मोठा उत्सव करण्यास निघून गेले, कारण जी वचने त्यांना वाचून दाखवली होती ती त्यांना समजली होती.


नाश होण्याच्या लागास आलेल्याचा मी आशीर्वाद घेई; विधवेचे मन आनंदित होऊन तिला मी गायला लावी.


जो गरिबाला छळतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा अवमान करतो; पण जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो.


ज्याची दृष्टी उदार त्याचे कल्याण होते, कारण तो आपल्या अन्नातून गरिबास देतो


जर तू आपल्या जिवाला इष्ट ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जिवांना तृप्त करशील; तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल,


तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे; तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे; तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय?


मग लोकांचे थव्यांचे थवे त्याच्याकडे आले; त्यांच्याबरोबर लंगडे, व्यंग असलेले, आंधळे, मुके व दुसरे पुष्कळ जण होते; त्यांना त्यांनी त्याच्या पायांशी आणून ठेवले आणि त्याने त्यांना बरे केले.


मग त्या दासांनी रस्त्यांवर जाऊन बरेवाईट असे जितके त्यांना आढळले त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मांडव जेवणार्‍यांनी भरून गेला.


तर जे आत आहे त्याचा2 दानधर्म करा म्हणजे पाहा, सर्व तुम्हांला शुद्ध आहे.


मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका; कारण तेही कदाचित तुम्हांला उलट आमंत्रण करतील व तुमची फेड होईल.


म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करण्यास त्यांच्याजवळ काही नाही; तरी नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल.”


मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधन्याला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, ‘नगराच्या रस्त्यांत व गल्ल्यांत लवकर जा, आणि दरिद्री, अपंग, आंधळे व लंगडे ह्यांना इकडे घेऊन ये.’


तेव्हा पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले; त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याबरोबर होती तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करत असे ती त्यांनी त्याला दाखवली.


आणि लेव्याला तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही म्हणून त्याने आणि तुझ्या गावातला उपरा, अनाथ व विधवा ह्यांनीही येऊन पोटभर खावे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल.


तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी, आणि तुझ्या गावातला लेवी, आणि तुमच्यामध्ये असलेला उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर.


ह्या सणात तुझा मुलगा व मुलगी, दास व दासी व तुझ्या गावात असलेला लेवी, उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्यासह तू आनंदोत्सव करावास.


अध्यक्ष अदूष्य, एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्थचित्त, सभ्य, अतिथिप्रिय, निपुण शिक्षक असा असावा.


जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागवली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कृत्यांस अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादीत नोंदण्यात यावी.


तर अतिथिप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी,


तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व माझे सांत्वन झाले; कारण, हे बंधो, तुझ्याकडून पवित्र जनांच्या जिवाला विश्रांती मिळाली आहे.


अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका; कारण तेणेकरून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan