Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 13:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणार्‍या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हांला वाटते काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 किंवा ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व त्याखाली दबून मारले गेलेले ते अठराजण यरूशलेम शहरात राहणाऱ्या इतर सर्व लोकांपेक्षा अधिक पापी होते असे तुम्हास वाटते का?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहमधील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेममध्ये राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते, असे तुम्हांला वाटते काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 किंवा शिलोआमाचा बुरूज जेव्हा त्या अठरा लोकांवर पडला आणि ते मरण पावले, तर तुम्हाला असे वाटते काय की, यरुशलेममध्ये राहणार्‍या सर्वांपेक्षा ते अधिक दोषी होते?

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 13:4
13 Iomraidhean Croise  

उरलेले लोक अफेक शहराकडे पळून जाऊन त्यात शिरले; तेव्हा शहराचा तट कोसळून त्यांच्यातल्या सत्तावीस हजार लोकांवर पडला. बेन-हदादही पळून व नगरातल्या एका घरातल्या आतल्या खोलीत लपून राहिला.


झरावेशीची डागडुजी मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी शल्लूम बिन कोल-होजे ह्याने केली; तसेच त्याने ती बांधून तिला छप्पर केले व कवाडे, कड्या व अडसर लावले; तसेच त्याने दावीदपुराहून उतरण्याच्या जिन्यापर्यंत राजाच्या बागेजवळील शेलह तळ्याचा कोट बांधला.


तेव्हा रानातून आलेल्या प्रचंड वार्‍याच्या सोसाट्याने त्या घराचे चार्‍ही कोपरे हादरले; त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि ती सगळी मरून गेली; हे तुला सांगायला मी एकटा निभावून आलो आहे.”


“हे लोक संथपणाने वाहणारे शिलोहाचे पाणी धिक्कारतात आणि रसीन व रमाल्याचा पुत्र ह्यांच्या सहवासात आनंद पावतात;


आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले.


आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हांला सोड;


आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो; आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस, [तर आम्हांला वाइटापासून सोडव.]”


मी तुम्हांला सांगतो, नव्हते; तरीपण जर तुम्ही पश्‍चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.”


मी तुम्हांला सांगतो, नव्हते; पण जर तुम्ही पश्‍चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल.”


त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यांना लावला आणि मला सांगितले, ‘शिलोह तळ्यावर जाऊन धू.’ मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली.”


आणि त्याला म्हटले, “जा; शिलोह (म्हणजे पाठवलेला) नावाच्या तळ्यात धू.” मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला.


ते जिवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बर्बर1 लोक एकमेकांना म्हणू लागले, “खरेच, हा माणूस घातकी आहे; हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देत नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan