Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 13:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 त्याने त्यांना म्हटले, “त्या खोकडाला जाऊन सांगा, ‘पाहा, मी आज व उद्या भुते काढतो व रोग बरे करतो, आणि तिसर्‍या दिवशी मी परिपूर्ण होईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ‘ऐक, मी लोकांतून भूते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

32 त्याने त्यांना म्हटले, “त्या कोल्ह्याला जाऊन सांगा, पाहा, मी आज व उद्या भुते काढतो व रोग बरे करतो आणि तिसऱ्या दिवशी मी माझे काम पुरे करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 येशूंनी उत्तर दिले, “त्या कोल्ह्याला जाऊन सांगा, की ‘मी आज व उद्या भुते काढीत आणि रोग बरे करीत राहीन आणि तिसर्‍या दिवशी माझा उद्देश पूर्ण करेन.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 13:32
16 Iomraidhean Croise  

द्राक्षीच्या मळ्यांची नासधूस करणार्‍या खोकडांना, त्या लहान कोल्ह्यांना आमच्यासाठी धरा, कारण आमचे द्राक्षांचे मळे फुलले आहेत.”


हे इस्राएला, तुझे संदेष्टे ओसाड जागी असलेल्या कोल्ह्यांसारखे झाले आहेत.


तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत, तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत, ते सकाळपर्यंत काही शिल्लक राहू देत नाहीत.


हेरोद राजाने त्याच्याविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे, म्हणून त्याच्या अंगी ही महत्कृत्ये दिसून येत आहेत.”


येशू त्यांना म्हणाला, “मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हांला दाखवली आहेत. त्यांतून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता?”


येशूने आंब घेतल्यानंतर, “पूर्ण झाले आहे,” असे म्हटले; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.


कारण ज्याच्यासाठी सर्वकाही आहे, व ज्याच्या द्वारे सर्वकाही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दु:खसहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते.


आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणार्‍या सर्वांचा युगानुयुगांच्या तारणाचा कर्ता झाला,


नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते; पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन ‘युगानुयुग’ परिपूर्ण केलेल्या ‘पुत्राला’ नेमते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan