Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 13:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 परंतु तो म्हणेल, ‘मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही; अहो, सर्व अन्याय करणार्‍यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 आणि तो तुम्हास म्हणेल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, अन्याय करणाऱ्यांनो तुम्ही सर्व माझ्यापासून दूर व्हा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 परंतु तो म्हणेल, ‘मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कुठले आहात, हे मला माहीत नाही. अहो, अधर्म करणाऱ्या सर्वांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 “त्यावर तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही व तुम्ही कुठले आहात हे मला माहीत नाही. तुम्ही सर्व अन्याय करणार्‍यांनो माझ्यापासून दूर निघून जा!’

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 13:27
15 Iomraidhean Croise  

कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो.


देशातल्या सर्व दुर्जनांचा मी रोज सकाळी विध्वंस करीत जाईन, म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणार्‍या सर्वांचा उच्छेद होईल.


अहो दुष्कर्म्यांनो, माझ्यापासून दूर व्हा म्हणजे मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन.


जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात त्यांना परमेश्वर दुष्कर्म्यांबरोबर घालवून देईल. इस्राएलास शांती असो.


मनात कपट असून आपल्या शेजार्‍यांशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी ह्यांच्याबरोबर मला ओढून नेऊ नकोस.


असत्य भाषण करणार्‍याचा तू नाश करतोस; खुनी व कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.


अहो दुष्कर्म्यांनो, तुम्ही सर्व माझ्यापुढून निघून जा, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.


त्यांनी मुले लहानाची मोठी केली, तरी एकही मनुष्य उरणार नाही असे मी त्यांना अपत्यहीन करीन; मी त्यांच्यापासून निघून जाईन तेव्हा त्यांना धिक्कार असो!


त्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो, मी तुम्हांला ओळखत नाही.’


मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.


घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकत म्हणू लागाल, ‘प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा.’ तेव्हा तो तुम्हांला उत्तर देईल, ‘तुम्ही कोठले आहात, हे मला माहीत नाही.’


जर कोणी देवावर प्रीती करत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे.1


पण आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे; तर मग दुर्बळ व निःसत्त्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता?


तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे : “प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan