Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 13:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेव्हा पाहा, अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती; ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेथे एक स्त्री होती, तिला दुष्ट आत्म्याने अठरा वर्षांपासून अपंग केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 तेथे अठरा वर्षे दुष्ट आत्म्याने पीडलेली एक स्त्री होती. ती कुबडी असल्यामुळे तिला सरळ उभे राहता येत नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तिथे एका स्त्रीला दुरात्म्याने अठरा वर्षे अपंग करून ठेवले होते. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 13:11
20 Iomraidhean Croise  

मग सैतान परमेश्वरासमोरून गेला; आणि त्याने ईयोबाला मोठमोठ्या गळवांनी नखशिखान्त अतिशय पिडले.


पतन पावणार्‍या सर्वांना परमेश्वर आधार देतो, व वाकलेल्या सर्वांना उभे करतो.


परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो; परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो.


माझ्या अंगाला आळेपिळे येतात, मी अगदी वाकून गेलो आहे; दिवसभर मी सुतक्याच्या वेषाने फिरतो.


हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन.


हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे म्हणून माझ्यावर दया कर; माझी हाडे ठणकत आहेत, हे परमेश्वरा, मला बरे कर.


नंतर येशू यहूदी लोकांच्या सभास्थानांत सुवार्तेची घोषणा करत व राज्याची सुवार्ता गाजवत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करत गालीलभर फिरला.


तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, “ह्याला असे होऊन किती काळ लोटला?” तो म्हणाला, “बाळपणापासून.


येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस.”


ही तर अब्राहामाची कन्या आहे; पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते; शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय?”


ह्या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.”


आणि दुष्ट आत्मे आणि विकार ह्यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मग्दालीया म्हटलेल्या मरीयेतून सात भुते निघाली होती ती,


तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला, त्याला भुते लागली होती; बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरांतून राहत असे.


तेव्हा बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली (जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्च केली होती) व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री


तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणीएक माणूस होता; त्याला मंदिरात जाणार्‍यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत.


बरे करण्याचा हा चमत्कार ज्या माणसावर घडला तो माणूस चाळीस वर्षांहून अधिक वयाचा होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan