Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 12:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा; हो, मी तुम्हांला सांगतो, त्याचीच भीती बाळगा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हास सांगतो. तुम्हास ठार मारल्या यानंतर तुम्हास नरकात टाकून देण्यास ज्याला अधिकार आहे, त्याची भीती धरा. होय, मी तुम्हास सांगतो, त्याचेच भय धरा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 तुम्ही कोणाची भीती बाळगावी, हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो:वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे, त्याची भीती बाळगा. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याची भीती बाळगा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 कोणाचे भय बाळगावे, हे मी तुम्हाला सांगतो: शरीराचा वध केल्यानंतर, नरकात टाकण्याचा ज्याला अधिकार आहे, त्याची भीती बाळगा. होय, मी सांगतो त्याचीच भीती बाळगा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 12:5
16 Iomraidhean Croise  

देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील.


परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते; आणि ज्याच्या ठायी श्रद्धा असते त्याच्या मुलांना ती आश्रयस्थान होते.


हे राष्ट्रांच्या राजा, तुला कोण भिणार नाही? हे तुला साजते; राष्ट्रांतील सर्व ज्ञात्यांत, त्यांच्या सर्व राज्यांत तुझ्यासमान कोणीच नाही.


त्यांना खास्द्यांचे भय होते, कारण बाबेलच्या राजाने ज्या गदल्या बिन अहीकाम ह्याला देशाचा अधिपती नेमले होते त्याला इश्माएल बिन नथन्या ह्याने जिवे मारले होते.


परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझे भय धरणार नाही काय? माझ्यापुढे थरथर कापणार नाही काय? मी तर समुद्राला वाळू ही सीमा नेमली आहे; ही सर्वकाळची मर्यादा त्याच्याने उल्लंघवत नाही; त्याच्या लाटा उचंबळतात तरी त्यांचे काही चालत नाही; त्या गर्जना करतात तरी त्यांना ती उल्लंघवत नाही.


जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या.


मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.


‘ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील.”’


मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.


तुम्ही तर सावध राहा; मी अगोदरच तुम्हांला सर्वकाही सांगून ठेवले आहे.


कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये; कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, हे आम्ही तुम्हांला आगाऊ सांगितले होते व बजावलेही होते.


जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे.


कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांना नरकात2 टाकले आणि न्यायनिवाड्याकरता अंधकारमय खाड्यात3 राखून ठेवले;


तो मोठ्याने म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटिका आली आहे. ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र’ व पाण्याचे झरे ‘निर्माण केले,’ त्याला नमन करा.”


‘हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?’ कारण तूच मात्र ‘पवित्र’ आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत, म्हणून ‘सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील.”’


तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय.


Lean sinn:

Sanasan


Sanasan