Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 12:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 परंतु ‘आपला धनी येण्यास उशीर लागेल’ असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांस व चाकरिणींस मारहाण करू लागेल, आणि खाऊनपिऊन मस्त होईल,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 पण जर तो नोकर मनात म्हणतो, ‘माझा मालक येण्यास फार उशीर करत आहे,’ आणि मग तो त्याच्या स्त्री व पुरूष नोकरांना मारहाण करायला व खाण्यापिण्यास सुरुवात करतो व झिंगतो,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

45 मात्र आपला धनी येण्यास उशीर लागेल, असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांना व चाकरिणींना मारहाण करू लागेल आणि खाऊनपिऊन मस्त होईल,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 परंतु जो सेवक आपल्या मनात म्हणेल, ‘माझा धनी येण्यास पुष्कळ विलंब होत आहे,’ आणि तो सोबतीच्या दासांना व दासींना मारहाण करू लागेल आणि पिणार्‍यांबरोबर खाऊ आणि पिऊ लागेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 12:45
31 Iomraidhean Croise  

तो त्यांना निर्भय राखतो म्हणून ते स्वस्थ असतात; त्यांच्या व्यवहारावर त्याची कृपादृष्टी असते.


पाहा, माझ्यासमोर हा लेख आहे; मी पारिपत्य करीपर्यंत उगा राहणार नाही, प्रतिफळ त्यांच्या पदरी मोजून घालीन;


तेव्हा पशहूराने यिर्मया संदेष्ट्याला फटके मारले आणि परमेश्वराच्या मंदिरातील वरल्या बाजूस बन्यामीनद्वारात खोडे होते त्यांत त्याला अडकवून ठेवले.


“मानवपुत्रा, ‘दिवस लांबत चालले आहेत, प्रत्येक दृष्टान्त निष्फळ होत आहे,’ ही जी म्हण इस्राएल देशात तुमच्या तोंडी पडली आहे तिचा अर्थ काय?


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी मेंढपाळ नसल्यामुळे माझी मेंढरे लुटीस गेली आहेत; माझी मेंढरे सर्व वनपशूंना भक्ष्य झाली आहेत; माझ्या मेंढपाळांना मेंढरांची शुद्ध नाही. मेंढपाळ आपणच चरतात, पण मेंढरांना चारत नाहीत.


आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला व त्यांना जिवे मारले.


मी तुम्हांला खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.


तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील, आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमील.


तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात येईल;


“प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग नीरस वाढतो; तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.”


आणखी त्या दिवसांत मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन;’ म्हणजे ते संदेश देतील;


कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात.


कारण कोणी तुम्हांला गुलामगिरीत लोटले, तुम्हांला खाऊन टाकले, तुम्हांला अंकित केले, स्वत:ला कोणी उच्च केले, कोणी तुमच्या तोंडात मारले, तर ते सगळे तुम्ही सहन करता.


तेथे तुम्ही आपले मुलगे व मुली, दास व दासी ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करावा; तुमच्या वेशींच्या आत राहणार्‍या लेव्यासहित आनंद करावा, कारण तुमच्याबरोबर त्याला काही वाटा किंवा वतन नाही.


झोप घेणारे रात्री झोप घेतात, आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात.


अनीतीचे वेतन म्हणजे अपकार हा त्यांच्या पदरी पडतो; दिवसाढवळ्या चैनबाजी करण्यात ते सुख मानतात, ते डाग व कलंक आहेत; तुमच्याबरोबर मेजवान्या झोडताना ते कपटाने वागतात व त्यांत त्यांना मौज वाटते.


ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत; कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो त्याचा तो दासही बनतो.


कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले’ आणि तू ‘त्यांना रक्त पिण्यास’ लावले आहे; ह्यास ते पात्र आहेत.”


तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व ‘पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे’ रक्त सापडले.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan