Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 12:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 तेव्हा प्रभू म्हणाला, “आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 तेव्हा प्रभू म्हणाला, “प्रभू त्याच्या इतर नोकरांना त्यांचे धान्य योग्यवेळी देण्यासाठी ज्याची नेमणूक करील असा व विश्वासू कारभारी कोण आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

42 प्रभू म्हणाला, “आपल्या परिवारातील नोकरांना योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील, असा विश्वासू व विवेकी नोकर कोण?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 यावर प्रभूजींनी उत्तर दिले, “प्रामाणिक व सुज्ञ कारभारी कोण आहे, ज्याच्यावर घरधनी त्याच्या सेवकांच्या अन्नाचे योग्य वेळी वाटप करण्याचे काम सोपवितो?

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 12:42
29 Iomraidhean Croise  

इतका की जे बुद्धिमान पुरुष पवित्रस्थानाचे सगळे काम करीत होते, ते सर्व आपापले काम सोडून देऊन मोशेकडे आले,


मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण ज्याचे हृदय कुटिल असते त्याचा तिरस्कार होतो.


मनुष्य आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद पावतो; समयोचित बोल किती उत्तम!


जो अंजिराचे झाड राखतो तो त्याचे फळ चाखतो; जो आपल्या धन्याच्या सेवेला जपतो त्याचा मान होतो.


रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्नसामग्रीची व्यवस्था करते, आणि आपल्या दासींना त्यांचा अन्नाचा वाटा देते.


शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे; तो रोज रोज सकाळी मला जागे करतो; शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो.


मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, ते त्यांना चारतील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


तुम्ही मेंढरांचे मांदे खाता, त्यांच्या लोकरीची वस्त्रे वापरता; त्यांतली लठ्ठलठ्ठ पाहून कापता, परंतु कळपाला चारत नाही.


तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्याजुन्या गोष्टी काढणार्‍या गृहस्थासारखा आहे.”


मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभार्‍याला म्हणाला, ‘कामकर्‍यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे.’


त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य.


तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, “रडू नकोस.”


मग योहानाने आपल्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारण्यास पाठवले की, “जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?”


तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हांला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की, देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरता मिळवली तिचे पालनपोषण तुम्ही करावे.


तरीपण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.


जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, विशेषेकरून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतींत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावेत.


वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर.


अध्यक्ष2 हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असला पाहिजे; तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका, अनीतीने पैसे मिळवणारा नसावा;


आपल्या अधिकार्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यायचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.


जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हांला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.


जे पुढे विदित होणार होते त्याविषयीच्या साक्षीसाठी ‘त्याच्या सबंध घरात मोशे सेवक ह्या नात्याने विश्वासू होता.’


प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभार्‍यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan