Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 12:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आणि मी माझ्या जीवाला म्हणेन, ‘हे जीवा, आता तुझ्यासाठी अनेक वर्षे पुरतील अशा पुष्कळ चांगल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 आणि मग मी स्वतःला म्हणेन, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका भरपूर माल साठवलेला आहे. विसावा घे, खा, पी, मजा कर.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 आणि मी स्वतःस म्हणेन, “पुढे अनेक वर्षे पुरेल एवढ्या धान्यांचा तुझ्याकडे साठा आहे. आता विसावा घे; खा, पी आणि आनंद कर.” ’

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 12:19
39 Iomraidhean Croise  

“स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो.


तो जिवंत असता आपल्या जिवाला धन्य समजून म्हणे, “तू आपले बरे करून घेतलेस म्हणजे लोक तुझी स्तुती करतील,”


जुलूमजबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेखी मिरवू नका; संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका.


दुष्टाईने मिळवलेली संपत्ती हितकर नाही, पण नीतिमत्ता मरणापासून मुक्त करते.


सुज्ञांचे धन त्यांचा मुकुट आहे; मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच राहते.


धनवानाचे धन त्याचे बळकट नगर आहे, त्याच्या मते ते उंच तटासारखे आहे.


जे पाहता पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावीस काय? कारण गगनात उडणार्‍या गरुडासारखे पंख धन आपणास लावते.


उद्याची खातरी मानू नकोस, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही.


हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.


मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे ह्यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही; हेही देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले.


पण पाहावे तर आनंद व हर्ष, बैल मारणे व मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षारस पिणे चालले आहे; “उद्या मरायचे आहे म्हणून खाऊनपिऊन घेऊ या,” असे ते म्हणत आहेत.


जे पहाटेस उठून मद्याच्या पाठीस लागतात, जे अपरात्रीपर्यंत द्राक्षारस पिऊन धुंद होतात त्यांना धिक्कार असो.


जे घराशी घर व शेताशी शेत जोडून घेतात, जागा मुळीच उरू देत नाहीत, त्यांना धिक्कार असो; तुमचीच काय ती देशात वस्ती आहे असे झाले आहे.


ते म्हणतात, “चला, या, मी द्राक्षारस घेऊन येतो; आपण मद्याने मस्त होऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल, तो अतिशय चैनीचा होईल.”


एफ्राईम म्हणतो, “मी खरोखर धनवान झालो आहे, मी संपत्ती मिळवली आहे, पापाचा बट्टा लागेल असा अधर्म माझ्या सर्व कमाईत माझ्या हातून झाला नाही.”


तुम्ही अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल हर्ष करता; तुम्ही म्हणता, “आम्ही आपल्या सामर्थ्याने सत्ता संपादली नाही काय?”


तो आपल्या जाळ्यांपुढे यज्ञ करतो, आपल्या पागाला विपुल धूप दाखवतो; कारण त्यांपासून त्याला विपुल धन व पुष्टिकारक अन्न मिळते.


मग त्याने म्हटले, ‘मी असे करीन; मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन; आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन.


कोणीएक श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करत असे.


तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात येईल;


मनुष्यस्वभावाप्रमाणे म्हणायचे तर इफिसात मी श्वापदांबरोबर लढाई केली ह्यात मला काय लाभ? मेलेले उठवले जात नाहीत, “तर चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या मरायचे आहे.”


नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते.


परंतु जी विलासी आहे ती जिवंत असून मेलेली आहे.


प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणांस उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.


विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी,


तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला; ‘वधाच्या दिवशी’ तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली.


कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तिपूजा ह्यांत चालण्यात जो काळ गेला तितका पुरे.


ज्या मानाने तिने आपला गौरव केला व विषयभोग घेतला, त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या; कारण ती ‘आपल्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे; मी काही विधवा नाही; मी दुःख पाहणारच नाही.’


तो त्याला तेथे घेऊन गेला तेव्हा त्याला असे दिसले की लोक जमिनीवर चोहोकडे पांगून खाऊनपिऊन मजा करीत आहेत; कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या प्रांतातून व यहूद्यांच्या प्रांतातून पुष्कळ लूट आणली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan