Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 12:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आणखी त्याने त्यांना म्हटले, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा कारण जेव्हा एखाद्या मनुष्याजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती त्याचे जीवन होत असे नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 आणखी त्याने त्यांना म्हटले, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली, तर ती त्याचे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करील असे नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 नंतर येशू त्यांना म्हणाले, “सावध राहा, सर्वप्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण पुष्कळ धनसंपत्ती मध्ये जीवन नसते.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 12:15
34 Iomraidhean Croise  

मग शिमी आपल्या गाढवांवर खोगीर घालून आपल्या दासांचा शोध करण्यासाठी गथास आखीशाकडे गेला व त्यांना तेथून घेऊन आला.


सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, “त्वचेसाठी त्वचा! मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.


कारण दुर्जन आपल्या मनातील हावेची शेखी मिरवतो; लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो.


नीतिमानाचे अल्प धन अनेक दुर्जनांच्या विपुल धनापेक्षा उत्तम आहे.


जुलूमजबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेखी मिरवू नका; संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका.


बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे ह्यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे हे बरे;


ज्ञानप्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे! सुज्ञता संपादन करणे रुप्यापेक्षा इष्ट आहे.


ज्या अधिपतीला बुद्धी कमी त्याचा जुलूम फार, ज्याला लोभीपणाचा तिटकारा वाटतो तो दीर्घायुषी होतो.


“कारण लहानथोर सर्व स्वहिताला हपापलेले आहेत; संदेष्ट्यापासून याजकापर्यंत सगळे कपटाचा व्यवहार करतात.


लोक येतात तसे ते तुझ्याकडे येऊन माझ्या लोकांच्या रीतीप्रमाणे तुझ्यापुढे बसतात, ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत; ते तोंडाने गोडगोड गोष्टी बोलतात, पण त्यांचे मन लोभवश झाले आहे.


ते शेतांचा लोभ धरून ती हरण करतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करतात; असे ते माणसावर व त्याच्या घरावर, माणसावर व त्याच्या वतनावर बलात्कार करतात.


विपत्तीच्या हातातून आपला बचाव व्हावा म्हणून आपले घरटे उंच ठिकाणी करावे, ह्या हेतूने जो आपल्या घराण्यासाठी अन्यायाने नफा मिळवतो त्याला धिक्कार असो.


जारकर्मे, चोर्‍या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा.


त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले.


धनलोभी परूशी हे सर्व ऐकत होते व त्याला हसत होते.


तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात येईल;


काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहेत की, ते ऐकतात, आणि संसाराच्या चिंता, धन व विषयसुख ह्यांत आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते व ते पक्‍वफळ देत नाहीत.


चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे1 ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.


तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ — ह्याला मूर्तिपूजा म्हणावे — हे जिवे मारा;


कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर गर्विष्ठ, निंदक, आईबापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र,


तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”


लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा, दोनशे शेकेल रुपे आणि सोन्याची पन्नास शेकेल वजनाची एक वीट ह्या वस्तू मला दिसल्या, तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या; पाहा, माझ्या डेर्‍यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत, व रुपे खाली आहे.”


त्यांचे डोळे व्यभिचारी वृत्तीने भरलेले आहेत; आणि पाप केल्यावाचून त्यांना राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात; त्यांचे हृदय लोभाला सवकलेले आहे; ते शापग्रस्त (लोक) आहेत;


ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील; त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan