लूककृत शुभवर्तमान 12:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकांना तुडवू लागले; तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “तुम्ही आपणांस परूश्यांच्या खमिराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आणि त्यादरम्यान हजारो लोकांचा समुदाय जमला होता आणि एवढा की ते एकमेकांना तुडवू लागले, तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोललाः “परूश्यांच्या खमिराविषयी जपा, म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी जपा. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 त्या वेळी येशूभोवती हजारो लोकांची इतकी गर्दी जमली होती की, तेथे चेंगराचेंगरी होऊ लागली. येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “परुश्यांचे खमीर म्हणजेच त्यांचा दांभिकपणा ह्याविषयी तुम्ही स्वतःला सांभाळा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्या दरम्यान हजारोंच्या संख्येने लोक एकत्र झाले त्यामुळे ते एकमेकास चेंगरू लागले. तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना म्हणाले, “या परूशी लोकांच्या खमिरापासून म्हणजे ढोंगीपणापासून सांभाळा. Faic an caibideil |