Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 11:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 परंतु तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही पुदिना, सताप व प्रत्येक भाजी ह्यांचा दशांश देता, पण न्याय व देवाची प्रीती ह्यांकडे दुर्लक्ष करता; ह्या गोष्टी करायच्या होत्या, व त्या सोडायच्या नव्हत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 परंतु तुम्हा परूश्यांना हाय असो कारण तुम्ही पुदिना, जीरे व प्रत्येक भाजीपाल्याचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रीती याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही नितीने जगावे व देवावर प्रीती करणे या गोष्टी प्रथम करणे आवश्यक आहे त्याचवेळेस इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

42 परंतु तुम्हा परुश्यांची केवढी दुर्दशा होणार! मसाल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे पुदिना, कढीपत्ता व प्रत्येक प्रकारची वनस्पती ह्यांचा तुम्ही दशांश देता आणि न्याय व देवाची प्रीती यांच्याकडे मात्र कानाडोळा करता. न्याय व देवप्रीती ह्या गोष्टी आचरणात आणणे आवश्यक होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 “तुम्हा परूश्यांना धिक्कार असो! तुम्ही पुदिना, शेपू व बागेतील प्रत्येक प्रकारची भाजी यांचा दशांश देत असला, तरी तुम्ही न्याय आणि परमेश्वराची प्रीती याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही दशांश निश्चितच द्यावा, पण ज्या अधिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सोडू नयेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 11:42
22 Iomraidhean Croise  

आणि आपण आपल्या मळलेल्या पिठाचा पहिला उंडा, समर्पित अंशाची अर्पणे, सर्व प्रकारच्या झाडांची फळे, द्राक्षारस व तेल हे याजकांकडे देवाच्या मंदिराच्या कोठड्यांत आणावे; आणि आपल्या जमिनीच्या उत्पन्नाचा दशमांश लेव्यांकडे न्यावा; कारण लेवी सर्व नगरांतून आमच्या शेतीच्या उत्पन्नाचा दशमांश घेत असतात.


नीतिमत्तेने व न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे.


ह्याला तू धरून राहावे, आणि त्यापासून तू आपला हात मागे घेऊ नये हे बरे; कारण जो देवाचे भय धरतो तो ह्या सर्वांतून पार पडेल.


हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे ह्यांवाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?


“मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो; मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? असे त्याच्या नावाचा अपमान करणार्‍या तुम्हा याजकांना परमेश्वर विचारतो. तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला?’


तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वराला कंटाळा आणला आहे, तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही कशाने त्याला कंटाळा आणला?’ तुम्ही म्हणता, ‘प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे व तो त्याच्यासंबंधाने संतुष्ट असतो, नाहीतर न्याय करणारा देव आहे कुठे?’ अशाने तुम्ही त्याला कंटाळा आणला आहे.


मनुष्य देवाला ठकवील काय? तुम्ही तर मला ठकवले आहे; असे असून तुम्ही म्हणता, ‘आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे?’ दशमांश व अर्पणे ह्यासंबंधाने.


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्‍यांनाही आत जाऊ देत नाही.


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत; ह्या करायच्या होत्या, तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही.


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात; त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत.


मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो.’


परंतु मी तुम्हांला ओळखले आहे की, तुमच्या ठायी देवाची प्रीती नाही.


“मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.


तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan