Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 11:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो; आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस, [तर आम्हांला वाइटापासून सोडव.]”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 आमच्या पापांची आम्हास क्षमा कर, कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला त्यांच्या अपराधांची क्षमा करतो आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला क्षमा करतो आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कारण जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा करतो; तशी तुम्ही आमच्या पापांची क्षमा करा आम्हास परीक्षेत आणू नका.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 11:4
31 Iomraidhean Croise  

ज्या दूताने मला सर्व आपदांतून सोडवले, तो ह्या मुलांचे अभीष्ट करो; माझे नाव व माझे पूर्वज अब्राहाम व इसहाक ह्यांचे नाव हे चालवोत आणि ह्यांची वाढ होऊन पृथ्वीच्या मध्यभागी ह्यांचा मोठा समुदाय होवो.”


तेव्हा तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक, तुझे लोक इस्राएल ह्यांच्या पापाची क्षमा कर आणि जो देश तू त्यांच्या पूर्वजांना दिला त्यात त्यांना परत आण.


तर तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक. इस्राएल तुझी प्रजा, तुझे सेवक, ह्यांच्या पापांची क्षमा कर, कारण ज्या सन्मार्गाने त्यांनी चालले पाहिजे तो तू त्यांना शिकवत आहेस; हा जो देश तू आपल्या लोकांना वतन करून दिला आहेस त्यावर पर्जन्यवृष्टी कर.


परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील. तुझ्या जिवाचे रक्षण करील.


हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर; कारण ती फार झाली आहे.


माझी दैन्यावस्था व माझे कष्ट पाहा; माझ्या सर्व पापांची क्षमा कर.


हे प्रभू, ऐक; हे प्रभू, क्षमा कर; हे प्रभू, ऐक, कार्य कर; विलंब लावू नकोस; हे माझ्या देवा, तुझे नगर व तुझे लोक ह्यांना तुझे नाम दिले आहे; म्हणून तुझ्याचप्रीत्यर्थ हे मागतो.”


तुम्ही शब्दांनिशी परमेश्वराकडे वळा; त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर; कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू.


म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला त्यांच्या अपराधांची मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील.”


तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे.”


मग त्याने त्यांना म्हटले, “तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे;


किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणार्‍या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हांला वाटते काय?


तो त्यांना म्हणाला, “झोप का घेता? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा.”


खडकाळीवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात; पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी माघार घेतात.


तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करतो.


मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही; आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे.


एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गार्‍हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा;


प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हांला स्थिर करील, व त्या दुष्टापासून राखील.


प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील, व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.


कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल; दया न्यायावर विजय मिळवते.


तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पाहा, ‘तुमची परीक्षा व्हावी’ म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे; आणि तुमचे ‘दहा दिवस’ हालअपेष्टांत जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.


धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणार्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan