Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 11:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 परंतु प्रभूने त्याला म्हटले, “तुम्ही परूशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता; पण तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा ह्यांनी भरला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 तेव्हा प्रभू त्यास म्हणाला, “तुम्ही परूशी प्याला व ताट बाहेरुन साफ करता पण तुम्ही आतून लोभीपणाने व दुष्टतेने भरलेले आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

39 परंतु प्रभूने त्याला म्हटले, “तुम्ही परुशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता मात्र तुमचे अंतर्याम हावरेपणा व दुष्टपणा ह्यांनी बरबटलेले असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 ते पाहून प्रभू त्याला म्हणाले, “तुम्ही परूशी लोक थाळी व प्याला बाहेरून स्वच्छ करता, पण तुमची मने लोभ आणि दुष्टपणा यांनी भरलेली असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 11:39
26 Iomraidhean Croise  

पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणार्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले;


परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते त्याने केले, पण ते खर्‍या अंत:करणाने केले नाही.


फाडून टाकणार्‍या व गर्जना करणार्‍या सिंहासारखे ते तोंड वासून माझ्यावर आले आहेत.


वाणी कळवळ्याची पण मन दुष्ट असणे हे, रुप्याचा मुलामा दिलेल्या मडक्यासारखे होय.


तो गोडगोड बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस, कारण त्याच्या हृदयात सात विषे आहेत;


आपला मळ धुतलेला नसता आपल्या मते स्वतःला शुद्ध समजणारा असा एक वर्ग आहे.


हे यरुशलेमे, तू आपल्या अंत:करणाची दुष्टता धुऊन टाक, म्हणजे वाचशील. तुझे वाईट विचार तुझ्यामध्ये कोठवर वसणार?


तिच्यात संदेष्ट्यांनी एकोपा केला आहे; भक्ष्य फाडून खाणार्‍या, गर्जणार्‍या सिंहाप्रमाणे ते लोकांचे प्राण ग्रासून टाकतात; ते धन व पैका हरण करतात; ते तिच्या विधवांची संख्या वाढवतात.


तिच्यातले सरदार भक्ष्य फाडून खाणार्‍या लांडग्यांसारखे आहेत; ते अन्यायाने कमाई करण्यासाठी रक्तपात करतात, मानवी प्राण्यांचा विनाश करतात.


तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत, तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत, ते सकाळपर्यंत काही शिल्लक राहू देत नाहीत.


कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोर्‍या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात.


खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत.


त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही स्वत:ला लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंत:करणे ओळखतो; कारण माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे.


तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, “रडू नकोस.”


मग योहानाने आपल्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारण्यास पाठवले की, “जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?”


त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही; तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो तसे म्हणाला.


शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता.


तेव्हा पेत्र म्हणाला, “हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे?


आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायांविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहूदी धर्मात मी पुढे गेलो होतो.


सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील; त्यांच्यापासूनही दूर राहा.


शुद्ध जनांस सर्वकाही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे ह्यांना काहीच शुद्ध नाही; त्यांची बुद्धी व विवेकभाव ही विटाळलेली आहेत.


देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पापी जनहो, हात निर्मळ करा; अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan