Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 10:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता; तो त्याला पाहून दुसर्‍या बाजूने चालता झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 तेव्हा त्याचवेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता. याजकाने त्यास पाहिले, पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

31 एक याजक त्याच वाटेने जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने निघून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 एक याजक त्या बाजूने आला आणि त्या मनुष्याला तिथे पडलेले पाहून, रस्ता ओलांडून निघून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 10:31
18 Iomraidhean Croise  

तो बातमी आणणारा तरुण म्हणाला, “मी सहज गिलबोवाच्या डोंगरात फिरत असता शौल आपल्या भाल्यावर टेकलेला आहे आणि रथ व स्वार त्याच्या पाठीशी येऊन अगदी भिडले आहेत असे मला दिसले.


माझ्या उजवीकडे दृष्टी लावून पाहा, मला ओळखणारा कोणी नाही; मला कशाचाही आश्रय नाही; माझ्या जिवाची पर्वा करणारा कोणी नाही.


निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे; मी अगदी बेजार झालो आहे; माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले, पण कोणी आढळला नाही; माझे कोणी समाधान करील म्हणून मी वाट पाहिली, पण कोणी आला नाही.


गरिबाची आरोळी ऐकून जो कानांत बोटे घालतो तोही आरोळी करील पण कोणी ऐकणार नाही.


मी परत येऊन भूतलावर आणखी पाहिले तो वेगवानांनाच शर्यतीत यश व वीरांनाच युद्धात विजयश्री मिळते असे नाही; शहाण्यांनाच अन्न व समंजसांनाच धन मिळते आणि ज्ञात्यांवरच अनुग्रह होतो असे नाही; तर सर्व कालवश व दैववश आहेत.


तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे; तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे; तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय?


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


याजकांनो, ऐका; हे इस्राएलाच्या घराण्या, लक्ष दे; हे राजघराण्या, कान दे; कारण तुम्हांला शासन होणार; तुम्ही मिस्पा येथे पाश, ताबोरावर पसरलेले जाळे असे झाला आहात.


मनुष्यांवर टपणार्‍या लुटारूंच्या टोळ्यांसारखी याजकांची टोळी आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात; त्यांनी महापाप केले आहे.


तुम्ही माझ्या वेदीवर निरर्थक अग्नी पेटवू नये म्हणून तुमच्यातला कोणी दरवाजे बंद करील तर बरे! तुमच्यात मला मुळीच संतोष नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; तुमच्या हातचे यज्ञार्पण मी मान्य करून घेणार नाही.


येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरीहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला; त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले.


तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसर्‍या बाजूने चालता झाला.


ती जाऊन शेतात कापणी करणार्‍यांच्या मागून सरवा वेचू लागली. आणि असे झाले की, शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातल्या बवाजाचा होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan