Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 10:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 हे कफर्णहूमा, ‘तू आकाशापर्यंत चढवले जाशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 हे कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत उंचावला जाशील काय? तू नरकापर्यंत उतरशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 हे कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत चढविला जाशील काय? नाही. तुला अधोलोकापर्यंत खाली फेकले जाईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 हे कफर्णहूमा, तू स्वर्गात घेतला जाशील काय? नाही, तू नरकात खोलवर जाशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 10:15
20 Iomraidhean Croise  

मग ते म्हणाले, “चला, आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरूज बांधू; आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही.”


ह्यामुळे अधोलोकाने आपली क्षुधा वाढवली आहे, आपले तोंड अमर्याद पसरले आहे; त्यात त्यांचे वैभव, त्यांचे जमाव, त्यांचा थाटमाट, तेथले मौज मारणारे पडतील.


बाबेल गगनापर्यंत उन्नत झाला असला, त्याने आपल्या उंच गढ्या अजिंक्य केल्या असल्या तरी माझ्याकडून त्याचा नाश करणारे येतील, असे परमेश्वर म्हणतो.


तेव्हा गर्तेत गेलेल्या प्राचीन काळच्या लोकांकडे तुला खाली टाकून गर्तेत गेलेल्यांबरोबर प्राचीन काळापासून ओसाड असलेल्या स्थानांत पृथ्वीच्या अधोभागी तुला राहायला लावीन म्हणजे तू पुन्हा वसणार नाहीस; पण मी जिवंतांच्या भूमीला वैभव देईन.


तू वैभवाने व मोठेपणाने एदेनातल्या वृक्षांपैकी कोणाच्या तोडीचा आहेस? तुला तर एदेनातल्या वृक्षांसह अधोलोकी लोटतील आणि तलवारीने ठार झालेल्यांसह बेसुंत्यांमध्ये तू पडून राहशील. फारो व त्याचा लोकसमूह ह्यांची अशी गती होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


“मानवपुत्रा, मिसरी लोकसमूहासाठी विलाप कर; त्याला, मिसरकन्येला व प्रख्यात राष्ट्रांच्या कन्यांना गर्तेत उतरणार्‍यांबरोबर अधोलोकी लोटून दे.


तलवारीने वधलेल्यांमध्ये ते पडतील; तिला तलवारीच्या हवाली केले आहे; तिला व तिच्या सर्व समूहास ओढून न्या.


बेसुंती लोकांपैकी जे वीर समरांगणात पडून शस्त्रास्त्रांसह अधोलोकी गेले व ज्यांच्या तलवारी त्यांच्या उशाखाली ठेवण्यात आल्या अशांबरोबर हे पडून राहिले नाहीत काय? कारण जिवंताच्या भूमीत ते वीरांना दहशत घालत, म्हणून त्यांची पातके त्यांच्या हाडांच्या ठायी आहेत.


तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केलेस, तुझे घरटे तार्‍यांमध्ये बांधलेस, तरी मी तुला तेथून ओढून खाली पाडीन, असे परमेश्वर म्हणतो.


जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या.


हे कफर्णहूमा, ‘तू आकाशापर्यंत उंचावलेला होशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील;’ कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते.


आणि नासरेथ सोडून जबुलून व नफताली ह्यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनार्‍यावरील कफर्णहूमास जाऊन राहिला;


तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले व आपणांस बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे व दात खाणे चालेल.


तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले.


आम्ही कोठे निघालो आहोत? तेथील लोक आमच्यापेक्षा धिप्पाड व उंच आहेत; तेथील नगरे मोठी असून त्यांचे तट गगनापर्यंत पोहचले आहेत आणि तेथे अनाकाचे वंशज आम्ही पाहिले, असे आमच्या भाऊबंदांनी आम्हांला सांगितले तेव्हा आमच्या हृदयाचे पाणीपाणी झाले.’


कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांना नरकात2 टाकले आणि न्यायनिवाड्याकरता अंधकारमय खाड्यात3 राखून ठेवले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan