Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 1:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 एकदा असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करत असता,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे त्याचे याजकाचे काम करत असता,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 एकदा जखऱ्या आपल्या संघाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे दैनंदिन काम करण्यासाठी गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 एकदा आपल्या गटाच्या अनुक्रमाने जखर्‍याह परमेश्वरापुढे याजक म्हणून सेवा करीत असताना,

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 1:8
16 Iomraidhean Croise  

इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आज्ञा केली होती त्यानुसार त्यांचा पूर्वज अहरोन ह्याच्या हस्ते त्यांना लावून दिलेल्या विधीप्रमाणे परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी पाळीपाळीने जावे म्हणून हा जाण्याचा क्रम त्यांना लावून दिला होता.


नादाब व अबीहू हे आपल्या बापापूर्वी निपुत्रिक मेले म्हणून एलाजार व इथामार हे याजकांचे काम करीत.


ह्या प्रकारे सर्व इस्राएलात लेवी आपली शिवारे व वतने सोडून यहूदा व यरुशलेम येथे आले; कारण त्यांनी परमेश्वराप्रीत्यर्थ याजकाचे काम करू नये म्हणून यराबाम व त्याचे पुत्र ह्यांनी त्यांना घालवून दिले होते.


त्याप्रमाणे जे अहरोन वंशातले याजक त्यांच्या प्रत्येक नगरात व शिवारात राहत असत त्या सर्व याजक पुरुषांना आणि लेव्यांपैकी ज्यांची वंशावळीत नोंद झाली होती त्यांनाही वाटणी देण्यासाठी माणसे नेमली होती.


परमेश्वराच्या छावणीच्या द्वारात होमबली व शांत्यर्पणे करणे, सेवाचाकरी करणे, उपकारस्तुती व स्तवन करणे ह्या सर्वांसाठी हिज्कीयाने याजकांचे व लेव्यांचे त्यांच्या-त्यांच्या सेवेप्रमाणे क्रमवार वर्ग नेमले.


त्याने आपला बाप दावीद ह्याच्या नियमानुसार याजकांच्या सेवेचे वर्ग नेमले आणि स्तुती करण्यास व याजकांच्या देखरेखीखाली सेवाचाकरी करण्यास त्याने लेव्यांनाही प्रत्येक दिवसाच्या विधीप्रमाणे त्यांच्या-त्यांच्या कामांवर नेमले; प्रत्येक द्वाराजवळ द्वारपाळांच्या पाळ्या ठरवल्या; कारण देवाचा माणूस दावीद ह्याने अशीच आज्ञा केली होती.


मोशेच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे याजकांची त्यांच्या वर्गाप्रमाणे आणि लेव्यांची त्यांच्या क्रमाप्रमाणे यरुशलेम येथील देवाच्या सेवेप्रीत्यर्थ योजना केली.


तुझा भाऊ अहरोन ह्याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ह्यांना इस्राएल लोकांतून आपल्याजवळ आण.


तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना ही वस्त्रे चढवून त्यांना अभिषेक करावा. त्यांच्यावर संस्कार करावा, आणि त्यांना पवित्र करावे म्हणजे ते याजक ह्या नात्याने माझी सेवा करतील.


त्यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी जे तुला करायचे ते हे : एक गोर्‍हा आणि दोन दोषहीन मेंढे घ्यावेत,


दर्शनमंडप व वेदी मी पवित्र करीन; आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांनाही मी पवित्र करीन.


आणि अहरोनाला व त्याच्या मुलांना कमरबंद बांध. त्यांच्या डोक्यांना फेटे बांध; ह्या प्रकारे ह्या निरंतरच्या विधीने त्यांना याजकपद प्राप्त व्हावे. ह्या प्रकारे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यावर संस्कार करावा.


आणि याजक ह्या नात्याने माझी सेवा करण्यासाठी अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना अभिषेक करून पवित्र कर.


पण वेदीच्या संबंधात किंवा अंतरपटाच्या आतील सेवेच्या बाबतीत तू व तुझे मुलगे ह्यांनी आपले याजकपण सांभाळावे; तुम्ही सेवा करावी, कारण मी तुम्हांला दान म्हणून याजकपणाची ही सेवा दिली आहे; कोणी परका जवळ आला तर त्याला जिवे मारावे.”


यहूदीयाचा राजा हेरोद ह्याच्या दिवसांत अबीयाच्या वर्गातील जखर्‍या नावाचा कोणीएक याजक होता; त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलीशिबा होते.


अलीशिबा वांझ असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते; ती उभयता वयातीतही झाली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan