Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 1:79 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

79 ‘ह्यासाठी की, त्याने अंधारात व मृत्युच्छायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा,’ आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

79 तिच्याकडून जे अंधारात आहेत व मृत्युच्या छायेत बसले आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी आणि आमचे पाय शांतीच्या मार्गास लावण्यासाठी दिवसाचा उदय करून आमची भेट घेईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

79 जे अंधारात जगत आहेत, जे मरणाच्या छायेत आहेत त्यांच्यावर प्रकाश पडावा आणि, आमच्या पायांना शांतीच्या मार्गाचे मार्गदर्शन प्राप्त व्हावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 1:79
36 Iomraidhean Croise  

जेथे काळोख, निबिड अंधकार आहे, अशा मृत्युच्छायेच्या अस्ताव्यस्त प्रदेशात मी जाईन; तेथला प्रकाश अंधकारच होय.”


अंधकार व मृत्युच्छाया ही त्याला आपला आप्त लेखोत; तो दिवस अभ्राच्छादित होवो; दिवसास जे काळोखी आणते ते सर्व त्याला भयभीत करो.


काही जण क्लेशाने व बेड्यांनी जखडले होते, ते अंधकारात व मृत्युच्छायेत बसले होते,


त्याने त्यांना अंधकारातून व मृत्युच्छायेतून बाहेर आणले. व त्यांची बंधने तोडून टाकली.


मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात.


परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल.


तरी तू आम्हांला कोल्हे राहतात त्या ठिकाणी ठेचले, मृत्युच्छायेने आच्छादले.


त्याचे मार्ग आनंदाचे आहेत; त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत.


मी नीतिमार्गाने, न्यायाच्या वाटांनी चालते;


माहीत नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यांना नेईन; अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांना चालवीन; त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन. ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही.


आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिशाळेतून बंदिवानांना व अंधारात बसलेल्यांना कारागृहातून बाहेर काढावे म्हणून मी असे करीन.


परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू, म्हणतो : “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.


परमेश्वर म्हणतो, “दुर्जनांना शांती नसते.”


तो परमेश्वर म्हणतो; “याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्राएलाच्या राखून ठेवलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे ह्यात काही मोठेसे नाही; तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो.”


तू बंदीत असलेल्यांना म्हणावे, ‘बाहेर या;’ अंधारात आहेत त्यांना म्हणावे ‘उजेडात या.’ ते रस्त्यांवर चरतील, सगळ्या उजाड टेकड्यांवरही त्यांना चारा मिळेल.


शांतीचा मार्ग त्यांना ठाऊक नाही; त्यांच्या मार्गात न्याय नाही; ते आपणांसाठी वाकडे मार्ग करतात; त्या मार्गांनी चालणार्‍या कोणालाही शांती ठाऊक नाही.


अंधकारात चालणार्‍या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणार्‍यांवर प्रकाश पडला आहे.


ते असेही म्हणाले नाहीत की, ‘ज्या परमेश्वराने आम्हांला मिसर देशातून आणले, आम्हांला रानातून वैराण व खाच-खळग्यांच्या प्रदेशातून, निर्जल देशातून व मृत्युच्छायेतून नेले, ज्या प्रदेशातून कोणी जातयेत नाही व जेथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हांला नेले, तो परमेश्वर कोठे आहे?’


परमेश्वर म्हणतो, “चवाठ्यावर उभे राहून पाहा आणि पुरातन मार्गांपैकी कोणता म्हणून विचारा; सन्मार्गाने चाला; अशाने तुमच्या जिवास विश्रांती मिळेल;” पण ते म्हणाले, ‘आम्ही चालणार नाही.’


अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे.”


ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या ‘इस्राएल’ लोकांचे ‘वैभव’ असे आहे.”


जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता.


जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे.


पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”


मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”


येशू ख्रिस्त (तोच सर्वांचा प्रभू आहे) ह्याच्या द्वारे देवाने ‘शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना आपले जे वचन इस्राएलाच्या’ संततीस पाठवले ते हे.


मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस, आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.’


त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही.”


कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला;


Lean sinn:

Sanasan


Sanasan