Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 1:71 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

71 म्हणजे आपल्या ‘शत्रूंच्या’ व आपला ‘द्वेष करणार्‍या’ सर्वांच्या ‘हातून’ सुटका करावी;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

71 जे आमचे शत्रू आहेत व जे आमचा द्वेष करतात त्यांच्यापासून सुटका करण्याचे अभिवचन त्याने आम्हास दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

71 ‘आपल्या शत्रूंच्या व आपला द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून तो आपली सुटका करील.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

71 आमच्या शत्रूपासून आणि आमचा द्वेष करणार्‍या सर्वांच्या हातातून आमचा उद्धार करावा,

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 1:71
19 Iomraidhean Croise  

तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरा; तोच तुम्हांला तुमच्या शत्रूंच्या हातून सोडवील.”


त्याने त्यांना त्यांचा द्वेष करणार्‍याच्या हातून सोडवले. शत्रूच्या हातून त्यांना मुक्त केले.


हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हांला तार, आम्हांला राष्ट्रांतून काढून एकवट कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे स्तवन करू, तुझ्या स्तवनात आम्हांला उल्लास वाटेल.


त्याच्या दिवसांत यहूदा सुरक्षित होईल, इस्राएल निर्भय वसेल, व जे नाव त्याला देतील ते हे :‘परमेश्वर आमची नीतिमत्ता.’


पाहा, मी आपल्या क्रोधाने, संतापाने व महारोषाने त्यांना ज्या ज्या देशांत हाकून दिले आहे त्यांतून त्यांना एकत्र करीन; मी ह्या स्थली त्यांना परत आणीन व सुरक्षित बसवीन.


ते त्यात निर्भय राहतील; ते घरे बांधतील, द्राक्षाचे मळे लावतील आणि त्यांच्या सभोवतालच्या त्यांच्या द्वेष्ट्यांना मी न्यायदंड करीन तेव्हा ते निर्भयपणे वसतील; मग त्यांना समजेल की, मी परमेश्वर त्यांचा देव आहे.”


मी क्षेमवचन देऊन त्यांच्याबरोबर करार करीन, देशातून दुष्ट पशू नाहीतसे करीन म्हणजे मग ते रानात निर्भय असे राहतील व जंगलात झोप घेतील.


ते ह्यापुढे परराष्ट्रांना भक्ष्य होणार नाहीत; वनपशू त्यांना फाडून खाणार नाहीत; तर ते निर्भय वसतील, कोणी त्यांना भीती घालणार नाही.


बहुत दिवस लोटल्यावर तुझा समाचार घेण्यात येईल; शेवटल्या वर्षी जो देश तलवारीपासून वाचेल व ज्या देशात अनेक राष्ट्रांतून जमा केलेले लोक पुनःपुन्हा उद्ध्वस्त होत असलेल्या इस्राएल पर्वतांवर वस्ती करतील, त्या देशावर तू चढाई करशील; तथापि त्या लोकांना राष्ट्रांतून बाहेर आणले असून ते सर्व निर्भय राहतील.


“इस्राएलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्याने ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांची ‘खंडणी भरून सुटका’ केली आहे;


ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून


हे इस्राएला, तू धन्य आहेस! परमेश्वराने उद्धरलेल्या राष्ट्रा, तुझ्यासमान कोण आहे? तो तुझ्या साहाय्याची ढाल आहे, तुझ्या प्रतापाची तलवार आहे. ह्यामुळे तुझे शत्रू तुला शरण येतील, तू त्यांची उच्च स्थाने पादाक्रांत करशील.”


पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan