Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 1:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 अलीशिबा वांझ असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते; ती उभयता वयातीतही झाली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलीशिबा वांझ होती, शिवाय ते दोघेही फार म्हातारे झाले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 अलिशिबा वांझ असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते व ती दोघे वयोवृद्ध झाली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्यांना मूलबाळ नव्हते, कारण अलीशिबा गर्भधारण करू शकत नव्हती आणि ती दोघेही खूप वयस्कर झालेली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 1:7
16 Iomraidhean Croise  

अब्राहामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, “शंभर वर्षांच्या माणसाला मूल होईल काय? नव्वद वर्षांच्या सारेला मूल होईल काय?”


अब्राहाम व सारा हे वृद्ध, वयातीत होते आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते.


इसहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली, कारण ती वांझ होती; परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली.


याकोबाला आपल्यापासून काही मूलबाळ होत नाही असे पाहून राहेल आपल्या बहिणीचा मत्सर करू लागली आणि ती याकोबाला म्हणाली, “आपण मला पुत्रवती करा, नाहीतर माझा प्राण चालला.”


दावीद राजा आता वृद्ध व वयातीत झाला होता; ते त्याच्यावर पांघरुणे घालत तरी त्याला ऊब येत नसे.


त्याने आपल्या सेवकाला विचारले, “हिच्यासाठी काय करावे?” गेहजी म्हणाला, “तिला मूलबाळ नाही; आणि तिचा नवरा वृद्ध आहे.”


यहूदीयाचा राजा हेरोद ह्याच्या दिवसांत अबीयाच्या वर्गातील जखर्‍या नावाचा कोणीएक याजक होता; त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलीशिबा होते.


ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती.


एकदा असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करत असता,


तथापि विश्वासाने दुर्बळ न होता, आपले निर्जीव झालेले शरीर (तो सुमारे शंभर वर्षांचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली;


वयोमर्यादेपलीकडे असताही सारेलादेखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली [व ती संतान प्रसवली], कारण तिने वचन देणार्‍यास विश्वसनीय मानले.


त्याला दोन बायका होत्या; एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नेला मुलेबाळे झाली होती, पण हन्नेला काही अपत्य नव्हते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan