Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 1:65 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

65 ह्यावरून त्यांच्याभोवती राहणार्‍या सर्वांना त्याचे भय वाटले; आणि यहूदीयाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

65 तेव्हा सर्व शेजारी भयभीत झाले आणि यहूदीया प्रांताच्या सर्व डोंगराळ प्रदेशात लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

65 ह्यावरून त्याच्या सभोवती राहणाऱ्या सर्वांना भय वाटले. यहुदियाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व घडामोडींविषयी लोक बोलू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

65 आणि सर्व शेजारी भयभीत झाले व डोंगराळ यहूदीया प्रदेशात राहणारे, येथील सर्व गोष्टींविषयी बोलू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 1:65
12 Iomraidhean Croise  

हेरोद राजाच्या काळात यहूदीयातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर, पाहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की,


त्या दिवसांत मरीया डोंगराळ प्रदेशामधील यहूदातील एका गावास घाईघाईने गेली;


मग ऐकणारे सर्व जण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टींवरून आश्‍चर्यचकित झाले.


तेव्हा ते सर्व अगदी थक्क झाले; ते देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, “आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.”


तेव्हा सर्वांना भय वाटले व ते देवाला गौरवत म्हणाले, “आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.”


मग इफिसात राहणारे यहूदी व हेल्लेणी ह्या सर्वांना हे कळले, तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा झाला.


तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले; आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती.


ह्यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणार्‍या सर्वांना मोठे भय वाटले.


हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणार्‍या सर्वांना मोठे भय वाटले.


ह्या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशाचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण ह्यांतील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे ह्यांचा धुव्वा उडवला; कोणालाही जिवंत राहू दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आज्ञा केल्याप्रमाणे सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला.


हे पाहून गिबोनातल्या माणसांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की, “आपल्या दासांवरला मदतीचा हात आखडता घेऊ नकोस; आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हांला मदत कर; कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत.”


पुढे साडेतीन दिवसांनंतर ‘जीवनाचा आत्मा’ देवापासून येऊन ‘त्यांच्यामध्ये शिरला तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले;’ आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे ‘भय वाटले.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan