Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ह्यास्तव, थियफील महाराज, मलाही वाटले की, सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्यात;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 म्हणून हे थियफिला महाराज, मी सर्व गोष्टींचा मुळापासून चांगला शोध केल्यामुळे मलाही हे बरे वाटले की, या सर्व घटनांविषयीची माहिती आपणाला व्यवस्थित पणे माहिती लिहावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 म्हणूनच, महाशय, ह्या सर्व माहितीचा मुळापासून काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर मी विचार केला की, त्या आपणासाठी व्यवस्थितपणे लिहून काढणे उचित ठरेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 सन्माननीय थियफिल, तुमच्यासाठी एक अचूक व अधिकृत वृतांत लिहून काढावा, हे मनात ठेऊन मी स्वतःसुद्धा प्रत्येक गोष्टीचा अगदी सुरुवातीपासून बारकाईने व काळजीपूर्वक शोध केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 1:3
17 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आमच्यासाठी केलेली अद्भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करता येणार नाही;1 मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत.


असे तू केलेस तरी मी उगा राहिलो; मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले; तथापि मी तुझा निषेध करीन. मी तुझी कृत्ये तुझ्यापुढे मांडीन.


उपदेशक ज्ञानी असून तो लोकांना ज्ञान शिकवत गेला; त्याने विचार व शोध करून पुष्कळ बोधवचने रचली.


ज्या गोष्टींसंबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खातरी झाली आहे, त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक


थियफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला,


तेव्हा पेत्राने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली :


तेव्हा माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये;


म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हांला हे योग्य वाटले की,


कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींशिवाय तुमच्यावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हांला योग्य वाटले :


तेथे काही दिवस राहून तो निघाला, आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत व फ्रुगिया ह्यांतील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला.


“महाराज फेलिक्स सुभेदार ह्यांना क्लौद्य लुसिया ह्याचा सलाम.


म्हणून त्यांचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने, सर्व प्रकारे व सर्वत्र स्वागत करतो.


पौल म्हणाला, “फेस्त महाराज, मी वेडा नाही, तर मी खरेपणाच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी बोलतो.


आपला बंधू अपुल्लोस ह्याने बंधुजनांबरोबर तुमच्याकडे यावे, म्हणून मी त्याची फार विनवणी केली; तथापि आताचयावे अशी त्याची इच्छा अगदी नव्हती; सवड होईल तेव्हा तो येईल.


पण जर ती तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधिक सुखी होईल; आणि मलाही देवाचा आत्मा आहे असे मला वाटते.


ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan