Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 1:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही; कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 पाहा, हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही व तू मुका राहशील कारण माझे शब्द जे योग्यवेळी पूर्णपणे खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील. तुला बोलता येणार नाही, कारण उचित समयी पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 आणि आता हे पूर्ण होईल त्या दिवसापर्यंत तू मुका होशील व तुला बोलता येणार नाही, कारण नेमलेल्या समयी माझे शब्द खरे होतील या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 1:20
22 Iomraidhean Croise  

त्या सरदाराने देवाच्या माणसाला म्हटले होते की, “परमेश्वराने आकाशकपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय?” त्याला त्याने प्रत्युत्तर दिले होते की, “तू आपल्या डोळ्यांनी पाहशील पण त्यांतले काही खाणार नाहीस.”


तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसाला म्हटले, “पाहा, परमेश्वराने आकाशकपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय?” त्याने त्याला म्हटले, “तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील पण त्यांतले काही खाणार नाहीस.”


तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्याला मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वरच की नाही?


एफ्राइमाचे शीर शोमरोन व शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र. तुम्ही भाव ठेवणार नाही तर तुमचा निभाव लागणार नाही.”’


त्या दिवशी त्या निभावलेल्या माणसाबरोबर बोलण्यास तुझे तोंड उघडेल; तू बोलशील, ह्यापुढे तू स्तब्ध राहणार नाहीस; असा तू त्यांना चिन्हवत होशील, म्हणजे त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”


तुझी जीभ तुझ्या टाळूस चिकटेल असे मी करीन, म्हणजे तू मुका होशील आणि तू त्यांचा निषेधकर्ता होणार नाहीस; कारण ते फितुरी घराणे आहे.


ह्याप्रमाणे तो हे शब्द माझ्याबरोबर बोलल्यावर मी जमिनीकडे आपले तोंड करून गप्प राहिलो.


ह्यावर परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना म्हटले, “तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, इस्राएल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रकट केले नाही, म्हणून ह्या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात ह्यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही.”


नंतर अकरा जण जेवायला बसले असता त्यांनाही तो प्रकट झाला; आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंत:करणाचा कठीणपणा ह्यांविषयी त्यांना दोष लावला.


ह्यावर तो म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? कोठवर तुम्हांला वागवून घेणार? त्याला माझ्याकडे आणा.”


देवदूताने त्याला उत्तर दिले, “मी देवासमोर उभा राहणारा गब्रीएल आहे; आणि तुझ्याबरोबर बोलण्यास व ही सुवार्ता तुला कळवण्यास मला पाठवण्यात आले आहे.


इकडे लोक जखर्‍याची वाट पाहत होते व त्याला पवित्रस्थानात उशीर लागल्यामुळे त्यांना आश्‍चर्य वाटले.


तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना; तेव्हा त्याला पवित्रस्थानात दर्शन झाले आहे असे त्यांनी ओळखले; तो त्यांना खुणा करत होता. तो तसाच मुका राहिला.


जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल.”


मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करत बोलू लागला.


कित्येकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय?


आपण अविश्वासी झालो, तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वत:विरुद्ध वागता येत नाही.


जे युगानुयुगाचे जीवन सत्यप्रतिज्ञ देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणार्‍या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले,


ह्यासाठी की, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणांला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे.


‘जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो;’ म्हणून आस्था बाळग आणि पश्‍चात्ताप कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan