Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 9:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 आणि परमेश्वराच्या समोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी ही भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 याहवेहपासून अग्नी येऊन त्याने वेदीवरील होमार्पण व चरबीही भस्म केली. जेव्हा लोकांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी मोठ्या आवाजाने जयजयकार केला आणि जमिनीवर लोटांगण घातले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 9:24
24 Iomraidhean Croise  

नंतर सूर्य मावळला आणि निबिड अंधकार पडला, तेव्हा असे झाले की धुमसती आगटी व जळती मशाल त्या शवांच्या तुकड्यांमधून जाताना दिसली.


तेव्हा अब्राम उपडा पडला, आणि देव त्याच्याशी बोलला; तो म्हणाला :


हिज्कीयाने परमेश्वराची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस; तूच आकाश व पृथ्वी ही निर्माण केली.


दाविदाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधून होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली आणि परमेश्वराचा धावा केला, परमेश्वराने त्या होमबलीच्या वेदीवर दिव्याग्नी पाडून त्याला उत्तर दिले.


पण तुझ्यासाठी निवासस्थान, तुला युगानुयुग राहण्यासाठी मंदिर मी बांधले आहे.”


“परमेश्वर चांगला आहे व इस्राएलावर त्याची दया सनातन आहे” असे गाऊन त्यांनी परमेश्वराची स्तुती व धन्यवाद आळीपाळीने केला. ते परमेश्वराचे स्तवन करू लागले तेव्हा परमेश्वराच्या मंदिराचा पाया घालत आहेत हे जाणून सर्व लोकांनी उच्च स्वराने जयजयकार केला.


हे इस्राएलाच्या मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवतोस, तो तू कान दे; जो तू करूबारूढ आहेस तो तू आपले तेज प्रकट कर.


तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले; त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले.


तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले.


वेदीवर अग्नी सतत जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये.


तेव्हा मोशे व अहरोन तेथे जमलेल्या इस्राएलाच्या सर्व मंडळीसमोर पालथे पडले,


तेव्हा ते पालथे पडून म्हणाले, “हे देवा, सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय?”


त्याने याकोबात अनीती पाहिली नाही, त्याला इस्राएलात क्लेश दिसले नाहीत; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर आहे; राजघोष त्याच्यामध्ये होत आहे.


मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली : “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”


‘राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे’ त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करतात,


त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडील कोकर्‍याच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व ‘धूपाने’ भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या; त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या ‘प्रार्थना’ होत.


तेव्हा राजासन, वडीलमंडळ व चार प्राणी ह्यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते, ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले :


पण त्याची स्त्री त्याला म्हणाली, “आपल्याला मारून टाकण्याची परमेश्वराची इच्छा असती तर त्याने आपल्या हातून होमबली व अन्नार्पण स्वीकारले नसते, आपल्याला हे सगळे प्रकट केले नसते, आणि ह्या वेळी त्याने ह्या अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या नसत्या.”


मग परमेश्वराच्या दूताने आपला हात पुढे करून हातातल्या काठीच्या टोकाने त्या मांसाला व बेखमीर भाकरींना स्पर्श केला, तेव्हा खडकातून अग्नी निघाला, आणि त्याने ते मांस व त्या बेखमीर भाकरी भस्म केल्या; ह्यानंतर परमेश्वराचा दूत त्याच्यापुढून अंतर्धान पावला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan