Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 9:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 त्यांनी बैलाची व मेंढ्याची चरबी, मेंढ्याचे चरबीदार शेपूट, आतड्यांवर जे पसरलेले आहे ते, गुरदे आणि काळजावरील पडदा ही त्याला सादर केली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 अहरोनाच्या मुलांनी बैलाची व मेंढ्याची चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा ही सर्व अहरोनाकडे आणली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 परंतु त्याने गोर्‍ह्याची व मेंढ्याची चरबी, म्हणजे चरबीदार शेपूट, आतड्यांवरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 9:19
7 Iomraidhean Croise  

मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजवून खाऊ नये, तर ते विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतडीसुद्धा खावीत.


त्याच्या आतड्यांवर असलेली सगळी चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्यांच्यावरील चरबी ही सर्व घेऊन त्यांचा वेदीवर होम करावा.


आणि याजकाने वेदीवर त्यांचा होम करावा. हे सुवासिक हव्यान्न होय; कारण चरबी म्हणून जेवढी असेल तेवढी परमेश्वराची आहे.


हे सर्व घेऊन अहरोनाच्या मुलांनी वेदीवर, विस्तवावर रचलेल्या लाकडांवरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम करायचा तो भाग हा : त्याची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यांवर असलेली चरबी,


पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील पडदा ह्यांचा त्याने वेदीवर होम केला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.


आणि त्यांनी चरबी त्या बलींच्या उरांवर ठेवली मग तिचा वेदीवर होम केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan