Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 8:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 ह्याप्रमाणे तुम्ही दर्शनमंडपाच्या दाराजवळ परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सात दिवस व रात्री राहा, नाहीतर तुम्ही मराल; कारण मला तशी आज्ञा झाली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 तेव्हा दर्शनमंडपाच्या दारापाशी तुम्ही सात दिवस व रात्री राहा, ही परमेश्वराची आज्ञा तुम्ही पाळली नाहीतर तुम्ही मराल; कारण मला तशी आज्ञा दिली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 शिवाय, सात दिवस सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ रात्रंदिवस राहून, याहवेहने दिलेल्या आज्ञेचे पालन केल्याने तुम्ही मरणार नाही, कारण मला अशी आज्ञा देण्यात आली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 8:35
24 Iomraidhean Croise  

तुझा देव परमेश्वर ह्याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ; त्याच्या मार्गांनी चाल; आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम, आज्ञा, निर्णय व निर्बंध पाळ; म्हणजे जे काही तू करशील त्यात व जिकडे तू जाशील तिकडे तुला यशःप्राप्ती होईल.


मी तुला आज्ञा केली आहे त्या सर्व गोष्टींप्रमाणे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचे कर; सात दिवसांपर्यंत त्यांच्यावर संस्कार कर.


तू सात दिवस रोज एकेका निर्दोष बकर्‍याचे पापार्पण कर; एक गोर्‍हा व कळपातील एक निर्दोष एडका हेही त्यांनी अर्पण करावे.


याजकांपैकी जे सादोकवंशज पवित्र केले आहेत, ज्यांनी माझे नियम पाळले आहेत, व जे लेव्यांप्रमाणे इस्राएल वंशजांबरोबर बहकले नाहीत,


अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू ह्यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यांत अग्नी घातला व त्यांवर धूप घालून तो अनधिकृत अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती.


आणि शुद्ध ठरवायच्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत, आपले मुंडण करवावे आणि पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने छावणीत यावे; तरी त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर राहावे.


हे झाल्यावर मोशेने अभिषेकाचे थोडे तेल व वेदीवरील थोडे रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे आणि त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे आणि त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ही पवित्र केली.


आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे अशी परमेश्वराने आज्ञा केली आहे.


मोशेच्या द्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा केली होती त्या सर्व अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी केल्या.


त्याने तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी ती राख घेऊन स्वतःला शुद्ध करावे; तथापि तिसर्‍या दिवशी आणि सातव्या दिवशी त्याने स्वतःला शुद्ध केले नाही तर तो शुद्ध ठरणार नाही.


अहरोन व सर्व मंडळी त्यांना निवासमंडपाच्या सेवेसंबंधाने जी काही कामगिरी सोपवतील ती त्यांनी दर्शनमंडपासमोर पार पाडावी.


मेघ निवासमंडपावर बरेच दिवस राहिला तरी इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळीत असत व कूच करीत नसत.


तेव्हा प्रियजनहो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.2


म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावीस आणि त्याने तुला लावून दिलेली व्यवस्था, त्याचे विधी, त्याचे नियम व त्याच्या आज्ञा नित्य पाळाव्यात.


माझ्या मुला तीमथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की, तू त्यांच्या द्वारेच सुयुद्ध कर;


देव, प्रभू येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत ह्यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की, मनात अढी न धरता ह्या आज्ञा पाळ, पक्षपाताने काही करू नकोस.


सर्व प्राणिमात्राला जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलातासमक्ष स्वतःविषयी चांगला पत्कर केला, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो,


प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणांस उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.


हे तीमथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ; अधर्माच्या रिकाम्या वटवटींपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतांपासून दूर राहा.


देवासमक्ष आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की,


नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते; पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन ‘युगानुयुग’ परिपूर्ण केलेल्या ‘पुत्राला’ नेमते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan