Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 8:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना अंगरखे घातले, कमरेला कमरबंद कसले आणि त्यांना फेटे बांधले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना विणलेले सदरे घातले, कमरेस कमरबंद घातले व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मग मोशेने अहरोनाच्या पुत्रांना पुढे आणले, त्यांना झगे घातले, कमरपट्टे कसले व फेटे बांधले, याहवेहने मोशेला आज्ञा दिल्यानुसार त्याने हे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 8:13
15 Iomraidhean Croise  

तुझे याजक नीतिमत्त्वाने भूषित होवोत; तुझे भक्त आनंदघोष करोत;


अहरोनाला पवित्र वस्त्रे घाल व त्याला अभिषेक करून पवित्र कर, म्हणजे तो याजक ह्या नात्याने माझी सेवा करील.


मोशेने तसे केले म्हणजे परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने तसे केले.


मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्लासतो; कारण जसा नवरा शेलापागोटे लेऊन स्वत:ला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकारांनी स्वत:ला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत; मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.


तुम्हांला तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल, लोक तुम्हांला आमच्या देवाचे सेवक म्हणतील; राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल, त्यांचे वैभव तुम्हांला प्राप्त झाल्याचा अभिमान वाहाल.


याजक आत गेल्यावर पवित्रस्थानातून बाहेरच्या अंगणात त्यांनी तसेच जाऊ नये; तर सेवेच्या वेळची आपली वस्त्रे त्यांनी त्या खोल्यांत ठेवावीत कारण ती पवित्र आहेत; मग त्यांनी दुसरी वस्त्रे घालून सार्वजनिक स्थानी जावे.”


मोशेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी येऊन त्यांच्या अंगरख्यांसहित त्यांना उचलून छावणीबाहेर नेले.


त्याची आतडी व पाय पाण्याने धुऊन मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले; ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.


तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’


आणि आपल्याला ‘राज्य’ आणि आपला देव व पिता ह्याच्यासाठी ‘याजक’ असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन.


आणि आमच्या देवासाठी त्यांना ‘राज्य’ व ‘याजक’ असे केले आहेस आणि ते पृथ्वीवर राज्य करतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan