Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 7:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 पापार्पणासारखेच दोषार्पण; दोहोंचा विधी एकच. जो याजक त्याच्या द्वारे प्रायश्‍चित्त करील त्याचा त्याच्यावर हक्क आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 दोषार्पण पापार्पणासारखेच आहे; त्या दोघांचे विधी एकच आहेत; जो याजक ह्याच्याद्वारे प्रायश्चित करील त्याचा त्या अर्पणावर हक्क आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “पापार्पणासारखेच दोषार्पण आहे; त्या दोघांचे नियम सारखेच आहेत. अर्पिलेला हा बली प्रायश्चित्तविधी करणार्‍या याजकाच्याच अधिकाराचा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 7:7
11 Iomraidhean Croise  

दोषार्पणे व पापार्पणे ह्यांचा पैसा येत असे तो मंदिरात जमा करत नसत; तो पैसा याजकांचा असे.


पुढे अरामाचा राजा हजाएल ह्याने स्वारी करून गथ घेतले आणि नंतर यरुशलेमेकडे आपला मोर्चा फिरवला.


आणि पवित्रस्थानात जेथे पापबली व होमबली ह्यांचा वध करतात तेथे ते कोकरू मारावे; कारण पापबलीप्रमाणेच दोषबलीवरही याजकाचा हक्क आहे; हे अर्पण परमपवित्र होय.


अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पायची जी हव्ये आहेत त्यांतला परमपवित्र होय.


अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पायची जी हव्ये आहेत त्यांतला परमपवित्र होय.


खमीर घालून ते भाजू नये. माझ्या हव्यातून त्यांचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिले आहे; पापार्पण अथवा दोषार्पण जसे परमपवित्र आहे तसेच हेही आहे;


जो याजक एखाद्या माणसासाठी होमबली अर्पण करील त्याचाच हक्क त्या होमबलीच्या कातड्यावर आहे.


पण अपराधाबद्दलची भरपाई स्वीकारण्यास त्या मनुष्याचा कोणी वारस नसला तर त्या अपराधाबद्दल परमेश्वराजवळ केलेली भरपाई याजकाची व्हावी; जो प्रायश्‍चित्ताचा मेंढा त्याच्या प्रायश्‍चित्तासाठी अर्पण करण्यात येईल त्याशिवाय हीही त्याची व्हावी.


जे जात्याच इस्राएल त्यांच्याकडे पाहा; यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार नाहीत काय?


मंदिरात सेवा करणारे मंदिरातले उत्पन्न खातात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan