Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 7:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्यांचा याजकाने वेदीवर परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणून होम करावा; हे दोषार्पण होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 या सर्वांचा याजकाने होम करावा; हे परमेश्वरासाठी होमार्पण आहे. हेच दोषार्पण होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आणि याजकाने या सर्वांचे याहवेहला अन्नार्पण म्हणून वेदीवर हवन करावे. हे दोषार्पण होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 7:5
13 Iomraidhean Croise  

त्याची आतडी व पाय त्याने पाण्याने धुवावेत. मग याजकाने ह्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे; हे होमार्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


त्याची आतडी आणि पाय त्याने पाण्याने धुवावेत. मग याजकाने त्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे; ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


चोळून काढलेले दाणे व तेल ह्यांपैकी काही भाग स्मारकभाग म्हणून सर्व धूपासहित याजकाने जाळावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य होय.


मग त्याने ते अहरोनाचे मुलगे जे याजक त्याच्याकडे आणावे; त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन याजकाने स्मारकभाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


याजकाने अन्नार्पणातून स्मारकभाग काढून वेदीवर त्याचा होम करावा; तो परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


आणि याजकाने वेदीवर त्यांचा होम करावा. हे सुवासिक हव्यान्न होय; कारण चरबी म्हणून जेवढी असेल तेवढी परमेश्वराची आहे.


परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम करायचा तो भाग हा : आतड्यांवर असलेली चरबी व त्यांना लागून असलेली सर्व चरबी,


त्याला कोकरू देण्याची ऐपत नसेल तर त्याने आपण केलेल्या पापाबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले अथवा पारव्याची दोन पिले परमेश्वराजवळ आणावीत; त्यांपैकी एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे.


दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत.


हा बली खाण्याचा हक्क याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे; तो पवित्र स्थळी खावा; तो परमपवित्र होय.


मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वत:ला माझ्याकरता दिले.


जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan