Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 7:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 त्याच्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीच्या मांसापैकी काहीही तिसर्‍या दिवशी खाण्यात आले तर ते मान्य होणार नाही; उलट, ते अमंगळ ठरेल; आणि जो कोणी ते खाईल त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा भोगावी लागेल.1

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 जर कोणी शांत्यर्पणाच्या यज्ञबलीच्या मांसातून तिसऱ्या दिवशी मांस खाईल तर परमेश्वरास ते आवडणार नाही, व तो ते अर्पण मान्य करणार नाही; ते अर्पण अमंगळ होईल; त्या पापाबद्दल भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेस तो स्वत: जबाबदार राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 शांत्यर्पणाच्या मांसापैकी काही मांस तिसर्‍या दिवशी खाल्ले, तर ज्याने ते अर्पण केले असेल त्याला स्वीकारले जाणार नाही. त्याचे त्यांना काहीच श्रेय मिळणार नाही, कारण ते अशुद्ध झाले आहे; त्यापैकी काहीही खाणारा व्यक्ती जबाबदार धरला जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 7:18
31 Iomraidhean Croise  

दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते.


ते कबरांमध्ये राहतात, गुप्त स्थानी रात्र काढतात; डुकराचे मांस खातात, अमंगळ पदार्थांचा रस त्यांच्या पात्रांत असतो;


जो बैल कापतो तो मनुष्यवध करणारा होय; जो मेंढ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान मोडणारा होय; जो अन्नार्पण करतो तो डुकराचे रक्त अर्पण करणारा होय; जो धूप दाखवतो तो मूर्तीचा धन्यवाद करणारा होय; ज्या अर्थी त्यांनी आपलेच मार्ग पसंत केले आहेत व अमंगळ पदार्थांनी त्यांचा जीव संतुष्ट होतो,


परमेश्वर ह्या लोकांना असे म्हणतो, त्यांना अशा प्रकारे भटकणे आवडले, त्यांनी आपले पाय आवरले नाहीत; म्हणून परमेश्वर त्यांचा स्वीकार करीत नाही; तो आता त्यांचे दुष्कर्म स्मरून त्यांच्या पापांची झडती घेईल.


ते उपोषण करतील तेव्हा मी त्यांची आरोळी ऐकणार नाही; ते होमार्पण व अन्नार्पण मला आणतील ती मी स्वीकारणार नाही; मी तलवारीने, दुष्काळाने व मरीने त्यांचा संहार करीन.”


जो जीवात्मा पाप करील तोच मरेल; मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही, आणि बाप मुलग्याच्या पातकाचा भार वाहणार नाही; नीतिमानाला त्याच्या नीतिमत्तेचे फळ मिळेल; दुष्टाला त्याच्या दुष्टतेचे फळ मिळेल.


त्यांनी मला केलेली यज्ञार्पणे म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय; पण ती परमेश्वर स्वीकारत नाही; आता तो त्यांचा अधर्म स्मरेल व त्यांच्या पापाचे शासन करील; ते मिसरास परत जातील.


“तुम्ही पापार्पण पवित्रस्थानी का खाल्ले नाही? ते परमपवित्र आहे व मंडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्‍चित्त करावे म्हणून ते तुम्हांला दिले आहे.


मग अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण ही परमेश्वरासमोर अर्पण केली आहेत, तरी माझ्यावर अशा आपत्ती ओढवल्या आहेत; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य झाले असते काय?”


जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ओंगळ आहेत; ते खाऊ नयेत.


त्याने आपले कपडे धुतले नाहीत व आपले शरीर धुतले नाही, तर त्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी.”


तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणाचा यज्ञ कराल तेव्हा तुम्ही मला मान्य व्हाल असा तो करा.


कोणी आपल्या बहिणीला, मग ती त्याच्या बापाची मुलगी असो अथवा त्याच्या आईची मुलगी असो, आपली बायको करून घेऊन तिची काया पाहील व ती त्याची काया पाहील तर हा निंद्य प्रकार होय; त्यांच्या भाऊबंदांच्या देखत त्या दोघांचा उच्छेद करावा. त्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी.


आपली मावशी अथवा आपली आत्या ह्यांची काया उघडी करू नये; जो कोणी तसे करील त्याने आपल्या जवळच्या आप्ताची काया उघडी केली असे होईल; त्यांनी आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी.


पवित्र पदार्थ खाल्ल्याच्या अपराधाबद्दल त्यांना दोषार्पण करावे लागेल; त्याला याजकांनी कारणीभूत होऊ नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”


बैल किंवा मेंढरू ह्याचा एखादा अवयव कमीजास्त असला तर तो स्वखुशीच्या अर्पणाला चालेल, पण नवस फेडण्याच्या कामी त्याचा स्वीकार होणार नाही.


ह्यांतील कोणतेही प्राणी परक्याच्या हातून घेऊन तुम्ही आपल्या देवासाठी अन्न म्हणून अर्पण करू नयेत; कारण ते सव्यंग व सदोष आहेत, म्हणून ते तुमच्याप्रीत्यर्थ स्वीकारले जाणार नाहीत.”


परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, जरी ते त्याने चुकून केले, तरी तो दोषी ठरेल व त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.


ज्या मांसाला एखाद्या अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये; ते अग्नीत जाळून टाकावे. जो कोणी शुद्ध असेल त्यानेच यज्ञबलीचे मांस खावे;


तुम्ही मला होम व अन्नार्पणे अर्पण केली तरी त्यांत मला काही संतोष नाही; तुमच्या पुष्ट पशूंच्या शांत्यर्पणाकडे मी ढुंकून पाहणार नाही.


तुम्ही माझ्या वेदीवर निरर्थक अग्नी पेटवू नये म्हणून तुमच्यातला कोणी दरवाजे बंद करील तर बरे! तुमच्यात मला मुळीच संतोष नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; तुमच्या हातचे यज्ञार्पण मी मान्य करून घेणार नाही.


‘काय पीडा ही!’ असे म्हणून तुम्ही नाक मुरडता, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही लुटून आणलेला, लंगडा किंवा रोगी असा पशू आणून अर्पण करता; तुमच्या हातचे असले अर्पण मला पसंत होईल काय? असे परमेश्वर म्हणतो.


हा तुमचा समर्पित अंश खळ्यातल्या धान्यासारखा व रसकुंडातल्या द्राक्षारसासारखा तुमच्या हिशोबी गणला जाईल.


त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही स्वत:ला लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंत:करणे ओळखतो; कारण माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे.


आणि तो ‘सुंता न झालेला असताना’ त्याच्या ठायी असलेल्या विश्वासामुळे जे नीतिमत्त्व प्राप्त होते, त्याचा शिक्का म्हणून ‘सुंता ही खूण’ त्याला मिळाली; ह्यासाठी की, जे लोक सुंता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्त्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने बाप व्हावे.


त्या अर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी’ एकदाच अर्पण केला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसर्‍यांदा दिसेल.


‘त्याने स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्ही निरोगी झाला आहात.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan