Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 6:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 याजकाने तो घेऊन परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे ज्या कृत्यामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मग याजकाने तो मेंढा घेऊन परमेश्वरासमोर जावे व त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग ज्या अपराधामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याप्रकारे त्यांच्यासाठी याजक याहवेहसमोर प्रायश्चित करेल आणि ज्या गोष्टींमुळे ते दोषी झाले असतील, त्याबद्दल त्यांना क्षमा केली जाईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 6:7
22 Iomraidhean Croise  

हजारो जणांवर1 दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा, (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.”


परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.


तथापि दुर्जन आपले दुराचरण सोडून नीतीने व न्यायाने वागला तर त्यामुळे तो वाचेल.


कोणाला परमेश्वराप्रीत्यर्थ अन्नार्पण करायचे असल्यास त्याने सपीठ अर्पावे; त्याच्यावर त्याने तेल ओतून वरती धूप ठेवावा.


पापार्पणाच्या गोर्‍ह्याचे जसे करायचे तसेच ह्याचेही करावे; ह्या प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्यांची क्षमा होईल.


शांत्यर्पणाच्या यज्ञपशूंच्या चरबीप्रमाणे ह्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; ह्या प्रकारे त्याच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.


आणि शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे ह्याचीही सर्व चरबी वेगळी काढून घ्यावी व ती परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून याजकाने तिचा वेदीवर होम करावा; याजकाने त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.


दुसर्‍या पक्ष्याचा त्याने विधिपूर्वक होम करावा; त्याने केलेल्या पापाबद्दल त्याच्यासाठी याजकाने प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल.


ह्या कोणत्याही गोष्टीसंबंधाने कोणी पाप केले तर त्याबद्दल याजकाने त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचा उरलेला भाग याजकाचा समजावा.”


त्याने कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी याजकाकडे आणावा; तू ठरवशील तेवढ्या किंमतीचा तो असावा; त्याने अज्ञानाने जी चूक केली असेल तिच्याबद्दल याजकाने प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.


परमेश्वर मोशेला म्हणाला,


ज्या ठिकाणी होमबलीचा वध करायचा त्याच ठिकाणी दोषार्पणाच्या बलीचा वध करावा, आणि याजकाने त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.


तुझ्यासमान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस; तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो.


ह्यास्तव मी तुम्हांला सांगतो की, प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्यांची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही.


पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.


जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan