Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 6:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 किंवा ज्या एखाद्या वस्तूच्या बाबतीत त्याने खोटी शपथ वाहिली असेल ती त्याने पुरी भरून द्यावी. ज्या वस्तूचा त्याने अपहार केला असेल तिची पुरी भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन वर आणखी तिचा एक पंचमांश भाग त्याने द्यावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 किंवा एखाद्या कामाबद्दल खोटी शपथ वाहीली तर ती त्याने पूर्ण भरून द्यावी ज्या वस्तुचा त्याने अपहार केला असेल तिची पूर्ण भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन त्या वस्तूंच्या किंमतीचा पाचवा हिस्सा अधिक भरावा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 किंवा अशा कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांनी खोटी शपथ घेतली असेल तर, ज्या दिवशी दोषार्पण आणतील, त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या गुन्ह्याबद्दल वीस टक्के अधिक दंड म्हणून त्या वस्तूच्या मालकाला द्यावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 6:5
16 Iomraidhean Croise  

त्याने हे कृत्य केले व त्याला काही दयामाया वाटली नाही म्हणून त्याने त्या मेंढीच्या चौपट बदला दिला पाहिजे.”


आपापल्या जमिनीचा प्रथमउपज व निरनिराळ्या वृक्षांची प्रथमफळे वर्षानुवर्ष परमेश्वराच्या मंदिरात आणावीत;


एखाद्या मनुष्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापले किंवा विकून टाकले, तर त्याने बैलाबद्दल पाच बैल आणि मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत.


चोरलेला बैल, गाढव, मेंढरू वगैरे चोराच्या हाती जिवंत सापडले तर त्याने एकेकाबद्दल दोन-दोन द्यावी.


कोणी शेजार्‍याजवळ पैसा किंवा काही माल ठेवायला दिला आणि त्याच्या घरातून तो चोरीस गेला, तर चोर सापडल्यास त्याच्या दुप्पट मोबदला चोराने द्यावा;


कारण कोणत्याही प्रकारची आगळीक घडली, मग ती बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र, अथवा कोणतीही गमावलेली वस्तू हिच्यासंबंधीची असो, आणि ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली, तर दोघांचे प्रकरण देवासमोर1 यावे व ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजार्‍याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा.


ह्या वेदीवर अहरोनाने सुगंधी द्रव्ययुक्त धूप जाळावा; रोज सकाळी तो तेलवात करील तेव्हा हा धूप त्याने जाळावा.


दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोर्‍या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय?


तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल; तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील;


तो दुर्जन गहाण परत करील, हरण केलेले परत देईल, आणि काहीएक अधर्म न करता जीवनाच्या नियमांप्रमाणे चालेल तर तो जगेलच, मरायचा नाही.


ज्या पवित्र वस्तूच्या बाबतीत त्याने पाप केले असेल तिची भरपाई त्याने करावी, आणि तिच्या मोलाचा आणखी पाचवा हिस्सा तिच्यात घालून ती याजकाला द्यावी; याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.


तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.”


हा मी तुमच्यापुढे आहे, परमेश्वरासमक्ष व त्याच्या अभिषिक्तासमक्ष माझ्याविरुद्ध काही असेल तर सांगा; मी कोणाचा बैल घेतला आहे काय? कोणाचे गाढव घेतले आहे काय? कोणाला फसवले आहे काय? कोणावर बलात्कार केला आहे काय? डोळेझाक करण्यासाठी कोणाच्या हातून लाच घेतली आहे काय? असे काही असल्यास सांगा म्हणजे मी त्याची भरपाई करीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan