Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 6:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 म्हणजे असले पाप करून दोषी झाला तर त्याने लूट करून किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते, किंवा आपल्याजवळची कोणाची ठेव बुडवली असेल ती, किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्याला सापडली असून त्याने परत केली नसेल ती,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 म्हणजे असले पाप करून दोषी झाला; तर त्याने चोरलेली किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते किंवा आपल्या जवळची कोणाची गहाण ठेवलेली वस्तू बूडविली असेल ती, किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्यास सापडली असून त्याने परत केली नसेल ती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 अशा कोणत्याही प्रकारे जर ते पाप करतील आणि त्यांच्या पापांची त्यांना जाणीव होईल, तेव्हा त्यांनी ती चोरलेली वस्तू किंवा बळजबरीने जे घेतले असेल ते किंवा जे काही त्यांच्यावर सोपविलेले असेल किंवा हरवलेली संपत्ती सापडल्यास ती परत करावी—

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 6:4
20 Iomraidhean Croise  

मग अबीमलेखाच्या चाकरांनी पाण्याची एक विहीर बळकावली होती त्याबद्दल अब्राहामाने अबीमलेखाला दोष लावला.


तर आजच्या आज कसेही करून त्यांची शेते, त्यांचे द्राक्षमळे, त्यांची जैतुनवने, त्यांची घरेदारे त्यांना परत द्या, तसेच पैसे, अन्न, नवा द्राक्षारस व तेल ह्यांचा जो शतांश तुम्ही त्यांच्यापासून काढत असता तो तुम्ही त्यांना परत द्या.”


तो दुबळ्यांस चिरडून तसाच टाकून गेला आहे; म्हणून त्याने जबरीने एखादे घर घेतल्यास ते त्याला वाढवून बांधता येणार नाही.


काही लोक मेरेच्या खुणा सारतात; ते बकर्‍यामेंढ्या हरण करून चारतात;


त्यांची जाळी पांघरण्याच्या उपयोगी नाहीत, ह्या आपल्या विणकामाने त्यांना स्वत:स झाकता येत नाही; त्यांची कामे केवळ उपद्रवजनक होत; त्यांच्या हातून बलात्काराची कामे होतात.


लाचार व दुबळे ह्यांच्यावर जुलूम केला, कोणास लुटले, कर्जदाराचे गहाण त्याला परत केले नाही, मूर्तीकडे पाहिले, अमंगल कृत्य केले,


त्याच्या बापाविषयी म्हणाल तर त्याने जुलूम केला, आपल्या भावाला लुटले व आपल्या लोकांत अनाचार केला, म्हणून पाहा, तो आपल्या अधर्मामुळे मरेल.


कोणावर जुलूम करत नाही, कर्जदाराचे गहाण त्याला परत करतो, कोणाला लुटत नाही, भुकेल्यास अन्न देतो व उघड्यास वस्त्र लेववतो,


तो दुर्जन गहाण परत करील, हरण केलेले परत देईल, आणि काहीएक अधर्म न करता जीवनाच्या नियमांप्रमाणे चालेल तर तो जगेलच, मरायचा नाही.


ते बाहेरील अंगणात जातील, लोकांमध्ये बाहेरील अंगणात जातील, तेव्हा त्यांच्या वस्त्रांच्या स्पर्शाने लोक पवित्र होऊ नयेत म्हणून त्यांनी सेवेच्या वेळची वस्त्रे काढून पवित्र खोल्यांत ठेवावीत व दुसरी वस्त्रे ल्यावीत.


जर कोणी एखाद्या ग्रामपशूला ठार मारले तर त्याने त्याच्याबदली दुसरा प्राणी देऊन भरपाई करावी.


पशू मारणार्‍याने त्याची भरपाई करावी; पण मनुष्यहत्या करणार्‍याला जिवे मारावे.


असा सगळा गोर्‍हा त्याने छावणीबाहेर जेथे राख टाकतात तेथे एका स्वच्छ ठिकाणी न्यावा आणि तो लाकडांवर ठेवून विस्तवात जाळून टाकावा. राख टाकीत असतात तेथे तो जाळून टाकावा.


परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, “हे जे आपल्या महालात बलात्कार व विध्वंस ह्यांच्या योगे धनसंचय करतात त्यांना सरळ आचरण करण्याचे ठाऊक नाही.”


ते शेतांचा लोभ धरून ती हरण करतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करतात; असे ते माणसावर व त्याच्या घरावर, माणसावर व त्याच्या वतनावर बलात्कार करतात.


त्या दिवशी जे उंबरठ्यावरून उडी मारून आपल्या प्रभूचा वाडा बलात्काराने व कपटाने भरून टाकतात त्या सर्वांचा समाचार मी घेईन.”


‘काय पीडा ही!’ असे म्हणून तुम्ही नाक मुरडता, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही लुटून आणलेला, लंगडा किंवा रोगी असा पशू आणून अर्पण करता; तुमच्या हातचे असले अर्पण मला पसंत होईल काय? असे परमेश्वर म्हणतो.


तर त्या व्यक्‍तीने स्वतःचे पाप कबूल करावे आणि ज्याचा अपराध केला असेल त्याला आपल्या अपराधाबद्दलची पूर्ण भरपाई करून देऊन त्यात आणखी तिच्या एक पंचमांशाची भर घालावी;


Lean sinn:

Sanasan


Sanasan