Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 6:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “कोणी परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून पाप केले, म्हणजे ठेव किंवा गहाण ह्यांच्या बाबतीत आपल्या शेजार्‍याला फसवले किंवा त्याच्यावर जुलूम केला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 जर कोणी परमेश्वराविरूद्ध आज्ञेचा भंग करून पाप केले म्हणजे एखाद्याने गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसवले किंवा लूट करून फसविले व त्याच्यावर जुलूम केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “जर कोणी त्याच्या शेजारच्या मनुष्यावर त्याने सोपविलेल्या काही गोष्टीबाबत फसवणूक करून किंवा त्याची काळजी न घेता किंवा काहीतरी चोरी करून किंवा त्यांच्या शेजार्‍याला फसवून याहवेहविरुद्ध विश्वासघात केला असेल, तर तो पाप करतो

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 6:2
25 Iomraidhean Croise  

तेथल्या लोकांनी त्याच्या बायकोसंबंधाने त्याच्याकडे चौकशी केली; तेव्हा तो म्हणाला, “ही माझी बहीण;” कारण “ही माझी बायको आहे” असे म्हणण्याची त्याला भीती वाटली; तो मनात म्हणाला, “रिबका देखणी आहे. तेव्हा येथले लोक तिच्यासाठी मला जिवे मारतील.”


तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे; म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील, व निवाडा करशील तेव्हा नि:स्पृह ठरशील.


आपल्या शेजार्‍याविरुद्ध विनाकारण साक्ष देऊ नकोस; तू आपल्या वाणीने ठकवू नकोस.


मला कष्टप्रद दृष्टान्त झाला आहे; लुटारू लुटत आहे, ठक ठकबाजी करीत आहे. हे एलामा, चढाई कर; हे मादया, वेढा घाल; त्याच्यामुळे लोक टाकत असलेले सर्व उसासे मी थांबवतो.


नीतिमानाची प्रतिष्ठा होवो अशी गीते दिगंतापासून आमच्या कानी पडली. तेव्हा मी म्हणालो, “माझा नाश झाला हो नाश झाला! हायहाय! ठकांनी ठकवले, ठकांनी ठकबाजीने ठकवले.”


अरे लुटार्‍या, तुला लुटले नाही; अरे ठका, तुला ठकवले नाही; तुला धिक्कार असो! तुझे लुटणे आटपले म्हणजे तुला लुटतील; तुझे ठकवणे आटपले म्हणजे तुला ठकवतील.


जो तो आपल्या शेजार्‍याला फसवतो; ते सत्य म्हणून बोलत नाहीत; त्यांनी आपल्या जिभेस खोटे बोलण्यास शिकवले आहे, ते कुटिलाचार करण्यासाठी स्वतःस शिणवतात.


आणि उत्तराभिमुख असलेली खोली वेदीचे रक्षण करणार्‍या याजकांसाठी आहे; ते सादोकाचे वंशज आहेत; ते लेवीच्या वंशातले असून परमेश्वरासमीप सेवा करण्यासाठी जातात.


गुराढोरांतले होमार्पण अर्पायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापुढे अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल.


तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये.


“कोणी परमेश्वराच्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या बाबतीत अज्ञानाने विश्वासघात केल्याने पापी ठरला, तर त्याने परमेश्वराला दोषार्पण करण्यासाठी कळपातील एक दोषहीन मेंढा घेऊन यावे; तू ठरवशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा तो असावा; हे शेकेल पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे असावेत; हे दोषार्पण होय.


हे दोषार्पण होय; परमेश्वरासमोर तो निश्‍चित दोषी आहे.”


परमेश्वर मोशेला म्हणाला,


तुम्ही म्हणता, “चंद्रदर्शन कधी आटोपेल? म्हणजे आम्हांला धान्य विकता येईल; शब्बाथ केव्हा संपेल म्हणजे आम्ही गहू बाहेर काढू, एफा लहान करू, शेकेल मोठा करू व खोट्या तागडीने फसवू;


तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टी लाववत नाही, तो तू ह्या बेइमानी करणार्‍यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून नीतिमान त्याला दुष्ट गिळून टाकतो तेव्हा तू का उगा राहतोस?


तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.


ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्यांशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस.”


म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजार्‍याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत.


एकमेकांशी लबाडी करू नका; कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतींसह काढून टाकले आहे;


कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan