Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 6:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 अन्नार्पणाचा विधी असा : अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदीपुढे ते अर्पावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 हा अन्नार्पणाचा नियम आहे: अहरोनाच्या मुलांनी ते परमेश्वरासमोर वेदीपुढे आणावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “अन्नार्पणासंबंधी नियम आहेत ते हे: अहरोनाच्या पुत्रांनी याहवेहसमोर वेदीपुढे अर्पण करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 6:14
12 Iomraidhean Croise  

तव्यावर ज्या वस्तू भाजण्यात येत त्यांवर देखरेख करण्यासाठी लेव्यांपैकी मत्तिथ्या ह्याला नेमले होते, हा शल्लूम कोरहीचा ज्येष्ठ पुत्र.


त्याची आतडी व पाय त्याने पाण्याने धुवावेत. मग याजकाने ह्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे; हे होमार्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


पंखांच्या मधोमध त्याने तो फाडावा, पण ते भाग वेगळे करू नयेत; मग याजकाने वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर त्याचा होम करावा; हे होमार्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


त्याची आतडी आणि पाय त्याने पाण्याने धुवावेत. मग याजकाने त्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे; ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


मग मोशेने अहरोनाला व त्याचे राहिलेले मुलगे एलाजार व इथामार ह्यांना सांगितले की, “परमेश्वराच्या हव्यांपैकी उरलेले अन्नार्पण घेऊन वेदीजवळ खमिरावाचून खा, कारण ते परमपवित्र आहे;


वेदीवर अग्नी सतत जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये.


त्या अन्नार्पणातून मूठभर सपीठ, थोडे तेल व त्यावरील सगळा धूप घेऊन अन्नार्पणाचा स्मारकभाग म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ सुवास व्हावा म्हणून त्यांचा वेदीवर होम करावा.


यज्ञ करणार्‍याने परमेश्वराप्रीत्यर्थ प्रत्येक कोकरामागे होमबलीबरोबर किंवा यज्ञासाठी एक चतुर्थांश हिनभर तेलात मळलेल्या एक दशांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे;


अन्नार्पण म्हणून दर मेंढ्यामागे एक तृतीयांश हिन तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ तयार करावे.


तेव्हा अर्पण करणार्‍याने गोर्‍ह्याबरोबर अर्धा हिन तेलात मळलेल्या तीन दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.


ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, मोशेने तुम्हांला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही; तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांला देतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan