Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याला कोकरू देण्याची ऐपत नसेल तर त्याने आपण केलेल्या पापाबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले अथवा पारव्याची दोन पिले परमेश्वराजवळ आणावीत; त्यांपैकी एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्यास कोकरु देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले परमेश्वरासमोर आणावी; त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 परंतु एखाद्याला याहवेहला कोकरू देणे शक्य नसेल, तर त्याने आपल्या पापांबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले, एक पापार्पणासाठी व एक होमार्पणासाठी आणावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 5:7
24 Iomraidhean Croise  

तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धी होण्याची मुदत पूर्ण झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचा मेंढा आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला दर्शनमंडपाच्या दारी याजकाकडे घेऊन जावा.


तिला मेंढा अर्पण करण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले, एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी आणावे, आणि याजकाने तिच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे ती शुद्ध होईल.”


त्यानंतर त्याला मिळालेले होले किंवा पारव्याची पिले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे;


त्याला जे पक्षी मिळाले असतील त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसर्‍याचे अन्नार्पणासहित होमार्पण करावे; ह्या प्रकारे याजकाने शुद्ध ठरवायच्या मनुष्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्‍चित्त करावे.


मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे आणि तिच्या स्रावाच्या अशुद्धतेमुळे तिच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्‍चित्त करावे.


मग त्याने इस्राएलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी दोन बकरे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा.


पण तू ठरवलेले मोल न देता येण्याइतका कोणी कंगाल असेल तर त्याला याजकापुढे उभे करावे, आणि याजकाने नवसाच्या माणसाचे मोल ठरवावे; नवस करणार्‍याच्या ऐपतीप्रमाणे याजकाने त्याचे मोल ठरवावे.


दोन होले अथवा पारव्याची दोन पिलेदेखील देण्याची त्याला ऐपत नसेल तर त्याने आपल्या पापाबद्दल एक दशमांश एफा सपीठ पापार्पण म्हणून आणावे; त्याच्यावर त्याने तेल घालू नये किंवा धूप ठेवू नये, कारण हे पापार्पण होय.


दोषार्पणाचा विधी असा : हे अर्पण परमपवित्र होय.


आणि इस्राएल लोकांना सांग की, तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा, आणि होमार्पणासाठी एक गोर्‍हा व एक कोकरू आणा, ही दोन्ही एका वर्षाची व दोषहीन असावीत;


“इस्राएल लोकांना असे सांग की, परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून जी पापे मानवप्राणी करतात, त्यांपैकी एखादे पाप कोणा पुरुषाने किंवा स्त्रीने केले आणि ती व्यक्ती दोषी ठरली,


आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले दर्शनमंडपाच्या दाराजवळ याजकाकडे आणावीत;


याजकाने एकाचा पापबली व दुसर्‍याचा होमबली अर्पून त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे, कारण त्या प्रेतामुळे त्याला पाप लागले होते; म्हणून याजकाने त्याच दिवशी त्याचे डोके पवित्र करावे.


पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.


नंतर येशू देवाच्या मंदिरात गेला आणि मंदिरात जे क्रयविक्रय करत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले, सराफांचे चौरंग व कबुतरे विकणार्‍यांच्या बैठका पालथ्या केल्या.


मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले, तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला,


आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिले’ ह्यांचा यज्ञ करावा.


कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या-त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते; नसेल तसे नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan