Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 5:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 बरीवाईट गोष्ट करण्याविषयी एखाद्याने अविचाराने प्रतिज्ञा केली; आणि ती प्रतिज्ञा अज्ञानाने केली असली व हे त्याला कळून आले तर अशा प्रत्येक गोष्टीसंबंधाने तो दोषी समजावा; मग ती अविचाराने प्रतिज्ञा केलेली गोष्ट कोणतीही असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 किंवा एखादी बरी किंवा वाईट गोष्ट करण्यासंबंधी कोणी आपल्या ओठांद्वारे अविचाराने शपथ घेतली आणि नंतर ती पूर्ण करण्यास तो विसरला; परंतु नंतर त्यास ती आठवली तर आपली शपथ पूर्ण न केल्यामुळे तो दोषी होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 किंवा जर कोणता व्यक्ती अविचाराने शपथ घेतो, मग ती शपथ चांगली असो वा वाईट असो, नंतर आपण ती शपथ अज्ञानाने घेतली हे त्याला कळून आले, तेव्हा तो दोषी ठरेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 5:4
25 Iomraidhean Croise  

दावीद व शौलाचा पुत्र योनाथान ह्यांची परमेश्वराच्या नावाने आणभाक झाली होती म्हणून शौलाचा नातू योनाथानाचा पुत्र मफीबोशेथ ह्याची राजाने गय केली.


तेव्हा तो म्हणाला, “शाफाटाचा पुत्र अलीशा ह्याचे शिर जर मी आज त्याच्या धडावर राहू देईन तर देव माझे असेच किंबहुना ह्याहूनही अधिक करो.”


कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला, आणि त्याने अविचाराचे शब्द तोंडातून काढले.


ह्या कोणत्याही गोष्टीसंबंधाने कोणी पाप केले तर त्याबद्दल याजकाने त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचा उरलेला भाग याजकाचा समजावा.”


त्याचप्रमाणे मनुष्याशी संबंध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तूला कोणी नकळत शिवला आणि आपण अशुद्ध झालो आहोत असे त्याला नंतर कळून आले तर तो दोषी समजावा; मग ती अशुद्ध करणारी वस्तू कोणत्याही प्रकारची असो.


तिने नवस केल्यावर किंवा ती अविचाराने व्रतबद्ध झाल्यावर तिचा विवाह झाला,


पण तिच्या पतीने ते ऐकले त्याच दिवशी तिला मनाई केली, तर तिने केलेले नवस आणि अविचाराने ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल ती रद्द ठरतील; आणि परमेश्वर तिला क्षमा करील.


त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की, “जे काही तू मागशील ते मी तुला देईन.”


तेव्हा राजाला वाईट वाटले; तरी आपल्या शपथांमुळे व जे पंक्तीस बसले होते त्यांच्यामुळे त्याने ते देण्याची आज्ञा केली;


तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.”


मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणारपिणार नाही.”


तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, “तुम्ही ही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ; आणि परमेश्वर आम्हांला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू.”


मग यहोशवाने त्यांच्याशी सलोखा करून त्यांना जीवदान देण्याचा करार केला; मंडळीच्या सरदारांनीही त्यांच्याशी आणभाक केली.


तर मी अम्मोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला सामोरा येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करीन.”


त्यांना मुली देणे आपल्यापैकी कोणालाही शक्य नाही, कारण इस्राएल लोकांनी अशी प्रतिज्ञा केली आहे की, जो आपली मुलगी बन्यामिनाला देईल तो शापित होईल.”


आपण तर परमेश्वराची शपथ वाहिली आहे, आपल्यापैकी कोणीही त्यांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत, तेव्हा त्यांतले जे उरले आहेत त्या प्रत्येकाला बायको मिळवून देण्याबाबत आपण काय करावे बरे?”


जर तुम्ही आज यरुब्बाल व त्याचे घराणे ह्यांच्याशी सात्त्विकतेने व सरळपणे वागला असाल तर अबीमलेखामुळे आनंद करा व तोही तुमच्यामुळे आनंद करो;


ती म्हणाली, “हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस,आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर त्याच्या आयुष्यभरासाठी मी त्याला परमेश्वराला समर्पित करीन; आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही;” असा तिने नवस केला.


तर सकाळी उजाडेपर्यंत त्याच्या लोकांपैकी एकही पुरुष मी जिवंत राहू देणार नाही; परमेश्वर माझ्या सर्व शत्रूंचे असेच व ह्याहूनही अधिक वाईट करो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan