Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 5:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ज्या पवित्र वस्तूच्या बाबतीत त्याने पाप केले असेल तिची भरपाई त्याने करावी, आणि तिच्या मोलाचा आणखी पाचवा हिस्सा तिच्यात घालून ती याजकाला द्यावी; याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 ज्या पवित्र वस्तूची विटंबना करून त्याने पाप केले असेल तिची त्याने भरपाई करावी आणि तिच्या किंमतीचा पाचवा हिस्सा रक्कम त्याने याजकाला द्यावी; ह्याप्रकारे याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्या मनुष्याकरिता प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 पवित्र वस्तू दूषित करून त्यांनी जे पाप केले त्याची ते भरपाई करतील. त्यांनी भरपाईची रक्कम देऊन वर वीस टक्के अधिक दंड द्यावा. त्यांनी दोषार्पणाचा एक मेंढा याजकाकडे आणावा आणि याजक त्यांच्यासाठी तो मेंढा अर्पून प्रायश्चित्त करेल व त्यांची क्षमा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 5:16
22 Iomraidhean Croise  

विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत; अन्यायाने माझ्याशी वैर करणारे, माझा जीव घेऊ पाहणारे, बलिष्ठ आहेत; मी हरण केले नव्हते तेही मला द्यावे लागले.


एखाद्या मनुष्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापले किंवा विकून टाकले, तर त्याने बैलाबद्दल पाच बैल आणि मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत.


एखाद्या मनुष्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्शाइतकी भर त्यात घालून याजकाला तो पवित्र पदार्थ द्यावा.


पण नवस करणार्‍याने तो सोडवला तर तू ठरवलेल्या मोलात त्याने आणखी एक पंचमांश भर घालून तो सोडवावा.


घर पवित्र करून वाहणारा मोल देऊन ते सोडवू पाहील तर तू ठरवलेल्या मोलात एक पंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे म्हणजे घर त्याचे होईल.


तो वत्स अशुद्ध पशूचा असला, तर तू ठरवलेल्या मोलात एक पंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा; पण तो सोडवत नसला, तर तू ठरवलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.


एखाद्याला आपल्या दशमांशातील काही भाग मोल देऊन सोडवायचा असल्यास त्यात त्याने एक पंचमांशाची भर घालून तो सोडवावा.


पापार्पणाच्या गोर्‍ह्याचे जसे करायचे तसेच ह्याचेही करावे; ह्या प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्यांची क्षमा होईल.


शांत्यर्पणाच्या यज्ञपशूंच्या चरबीप्रमाणे ह्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; ह्या प्रकारे त्याच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.


दुसर्‍या पक्ष्याचा त्याने विधिपूर्वक होम करावा; त्याने केलेल्या पापाबद्दल त्याच्यासाठी याजकाने प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल.


ह्या कोणत्याही गोष्टीसंबंधाने कोणी पाप केले तर त्याबद्दल याजकाने त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचा उरलेला भाग याजकाचा समजावा.”


आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वराप्रीत्यर्थ त्याने दोषार्पण आणावे; त्याने कळपातील कोकरांची किंवा करडांची एक मादी पापार्पण म्हणून आणावी; आणि याजकाने त्याच्या पापाबद्दल त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे.


ज्या ठिकाणी होमबलीचा वध करायचा त्याच ठिकाणी दोषार्पणाच्या बलीचा वध करावा, आणि याजकाने त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.


तर त्या व्यक्‍तीने स्वतःचे पाप कबूल करावे आणि ज्याचा अपराध केला असेल त्याला आपल्या अपराधाबद्दलची पूर्ण भरपाई करून देऊन त्यात आणखी तिच्या एक पंचमांशाची भर घालावी;


पण अपराधाबद्दलची भरपाई स्वीकारण्यास त्या मनुष्याचा कोणी वारस नसला तर त्या अपराधाबद्दल परमेश्वराजवळ केलेली भरपाई याजकाची व्हावी; जो प्रायश्‍चित्ताचा मेंढा त्याच्या प्रायश्‍चित्तासाठी अर्पण करण्यात येईल त्याशिवाय हीही त्याची व्हावी.


तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.”


तर पहिल्याने दिमिष्कातील लोकांना व यरुशलेमेत, अवघ्या यहूदीया देशात व परराष्ट्रीय लोकांत मी उपदेश करत आलो की, पश्‍चात्ताप करा आणि पश्‍चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा.


ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश तुम्ही माघारी पाठवणार तर तो नुसता पाठवू नका; त्याबरोबर त्याला दोषार्पणाचा बली अवश्य पाठवा म्हणजे तुम्ही बरे व्हाल व अद्यापि तुमच्यावरला त्याचा हात का निघत नाही हे तुम्हांला कळेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan