Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे आणि परमेश्वरासमोर, पवित्रस्थानाच्या अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे व परमेश्वरासमोर, परमपवित्र स्थानातील अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 याजकाने पवित्रस्थान वेगळे करणार्‍या पडद्यासमोर याहवेहपुढे सात वेळा शिंपडावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 4:6
22 Iomraidhean Croise  

त्याने तो कोश निवासमंडपात नेला आणि अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.


त्याने दर्शनमंडपात अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली;


मग त्याने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले थोडे परमेश्वरासमोर सात वेळा बोटाने शिंपडावे.


याजकाच्या तळहातावर उरलेले तेल त्याने शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या डोक्याला लावावे आणि त्याच्यासाठी त्याने परमेश्वरासमोर प्रायश्‍चित्त करावे.


मग त्याने आपल्या उजव्या हाताच्या बोटाने आपल्या डाव्या तळहातावरील थोडे तेल परमेश्वरासमोर सात वेळा शिंपडावे.


आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवायच्या मनुष्यावर सात वेळा शिंपडावे; मग तो शुद्ध झाला आहे असे सांगून त्या जिवंत पक्ष्याला माळरानात सोडून द्यावे;


मग त्याने गोर्‍ह्याचे थोडे रक्त घेऊन दयासनाच्या पूर्वेकडील बाजूला बोटाने शिंपडावे, आणि थोडे रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे.


आणि थोडे रक्त घेऊन त्याने आपल्या बोटाने सात वेळा तिच्यावर शिंपडून ती इस्राएल लोकांच्या अशुद्धतेपासून शुद्ध व पवित्र करावी.


सात शब्बाथवर्षे म्हणजे सात गुणिले सात एवढी वर्षे मोजा; ह्या सात शब्बाथवर्षांचा काळ एकोणपन्नास वर्षे होय.


इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हांला सातपट शिक्षा करीन,


तर मीही तुमच्या अगदी विरुद्ध जाईन आणि मीच तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


तर मी संतापून तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


याजकाने त्या रक्तात आपले बोट बुडवावे आणि परमेश्वरासमोर, अंतरपटासमोर, ते सात वेळा शिंपडावे.


मग याजकाने आपल्या बोटाने त्या पापार्पणाचे थोडे रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.


मग याजकाने त्याचे थोडे रक्त बोटाने घेऊन ते होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे सर्व रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.


याजकाने आपल्या बोटाने पापबलीचे थोडे रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.


त्यातील थोडे तेल घेऊन त्याने वेदीवर सात वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक ह्यांना पवित्र करण्यासाठी अभिषेक केला.


तो वधल्यावर मोशेने त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या चहूकडील शिंगांना व सभोवताली लावून ती शुद्ध केली आणि ते रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतले व ह्या प्रकारे ती पवित्र करण्याकरता तिच्यासाठी प्रायश्‍चित्त केले.


मग अहरोनाचे मुलगे त्याच्याकडे रक्त घेऊन गेले, तेव्हा त्याने आपले बोट त्यात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले आणि ते वेदीच्या पायथ्याशी ओतले.


मग एलाजार याजकाने आपल्या बोटाने तिचे थोडे रक्त घेऊन ते दर्शनमंडपाच्या समोरच्या दिशेकडे सात वेळा शिंपडावे;


सात याजकांनी सात रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी रणशिंगे फुंकावीत.


यहोशवाने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे सात याजक परमेश्वरापुढे सात रणशिंगे फुंकत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan