Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 4:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “इस्राएल लोकांना असे सांग : परमेश्वराने निषिद्ध ठरवलेल्या कृत्यांपैकी एखादे कृत्य चुकून केल्याने कोणाकडून पाप घडले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 इस्राएल लोकांस असे सांग: जर कोणी परमेश्वराने निषिद्ध केलेल्या कृत्यापैकी एखादे कृत्य केले किंवा चुकून त्याच्या हातून पाप घडले तर त्याने पुढील गोष्टी कराव्यात:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “इस्राएली लोकांस सांग की जो कोणी अजाणतेने पाप करून याहवेहच्या नियमानुसार निषिद्ध कृत्ये करत असेल, तर त्याच्यासाठी हे नियम आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 4:2
18 Iomraidhean Croise  

अबीमलेखाने अब्राहामाला बोलावून आणून म्हटले, “तू हे काय केलेस? मी तुझा असा कोणता अपराध केला की तू माझ्यावर व माझ्या राज्यावर असे महापातक आणलेस? करू नये असे वर्तन तू माझ्याशी केलेस.”


स्वत:च्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर.


तसेच धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर; त्यांची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन. आणि महापातकापासून अलिप्त राहीन.


तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नकोस. मी चुकून बोललो असे दिव्यदूतासमोर म्हणू नकोस; तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन त्याने तुझ्या हातची कामे नष्ट का करावीत?


एखाद्या मनुष्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्शाइतकी भर त्यात घालून याजकाला तो पवित्र पदार्थ द्यावा.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला,


इस्राएलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते जनसभेच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याने ते दोषी ठरले,


आपला देव परमेश्वर ह्याने निषिद्ध ठरवलेले कोणतेही कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून एखादा अधिपती दोषी ठरला,


परमेश्वराने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून सामान्य लोकांपैकी कोणी दोषी ठरला,


तेव्हा तुमच्याकरता शरणपुरे म्हणून काही नगरे ठरवा; म्हणजे कोणाच्या हातून चुकून मनुष्यवध झाला तर त्याने तेथे पळून जावे.


मनुष्यवध करणार्‍याने तेथे पळून जाऊन आपला प्राण वाचवण्याची केलेली सोय अशी : पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजार्‍याला ठार मारले, तर त्याने तेथे जावे.


कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेवले; मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली;


अज्ञानी व बहकणारे ह्यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वत: दुर्बलतेने वेष्टलेला आहे.


परंतु दुसर्‍यात प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा जात असतो तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल1 जे रक्त अर्पण करत असतो, ते घेतल्याशिवाय जात नाही.


एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत.


आपल्या बापाने लोकांना शपथ घालून मनाई केली होती हे योनाथानाला ठाऊक नव्हते; म्हणून त्याने आपल्या हातात असलेल्या काठीचे टोक पुढे करून मधाच्या पोळ्यात खुपसले, आणि मध हातात घेऊन तोंडाशी नेला; तेव्हा त्याचे डोळे टवटवीत झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan