Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम करायचा तो भाग हा : त्याची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यांवर असलेली चरबी,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 अर्पण करणाऱ्यांने शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरास हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी द्यावा. त्याने त्या पशूची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यावरील भोवतालची चरबी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 शांत्यर्पणातून जे अन्नार्पण तुम्ही याहवेहसाठी आणावयाचे ते हे: त्याची चरबी, पाठीच्या हाडाजवळून कापलेली संपूर्ण चरबीदार शेपटी, आतील अवयव आणि त्याला जोडून असलेली सर्व चरबी,

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 3:9
15 Iomraidhean Croise  

लोक परमेश्वराचा कोश नगरात घेऊन आले व त्याच्या स्थानी म्हणजे जो तंबू दाविदाने त्याच्यासाठी उभा केला होता त्यात त्यांनी तो ठेवला; तेव्हा दाविदाने परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली.


शलमोन जागा झाला तेव्हा आपल्याला स्वप्न पडले असे त्याला समजले; मग यरुशलेमेला जाऊन त्याने परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभे राहून होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली व आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली.


शलमोनाने शांत्यर्पणासाठी परमेश्वरापुढे अर्पण केलेले बळी बावीस हजार बैल आणि एक लाख वीस हजार मेंढरे होती. अशा रीतीने राजाने व सर्व इस्राएलांनी परमेश्वराच्या मंदिराचे प्रतिष्ठापन केले.


त्या दिवशी राजाने परमेश्वराच्या मंदिराच्या पुढल्या अंगणामध्ये एक स्थान पवित्र करून होमबली, अन्नबली आणि शांत्यर्पणाची चरबी ही तेथेच अर्पण केली, कारण परमेश्वरासमोर असलेल्या पितळेच्या वेदीवर त्यांचा समावेश होईना.


लोकांनी देवाचा कोश आणून त्यासाठी दाविदाने तयार केलेल्या तंबूत तो नेऊन ठेवला व त्यांनी देवापुढे होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली.


तो मेंढा संस्काराचा आहे म्हणून त्याची चरबी, त्याचे चरबीदार शेपूट, त्याच्या आतड्यांवरील चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्यांच्यावरील चरबी आणि उजवी मांडी, ही घे.


माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत.


त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले; त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल.


ह्याचा हेतू असा की, इस्राएल लोक जे आपले यज्ञपशू खुल्या मैदानात मारत असतात, ते त्यांनी दर्शनमंडपाच्या दाराशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणून परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणे म्हणून अर्पावेत.


त्याची सर्व चरबी त्याने अर्पण करावी; त्याचे चरबीदार शेपूट, आतड्यांवर असलेली चरबी,


त्याने चरबी, चरबीदार शेपूट, आतड्यांवर असलेली सर्व चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी ही काढून घेतली;


त्यांनी बैलाची व मेंढ्याची चरबी, मेंढ्याचे चरबीदार शेपूट, आतड्यांवर जे पसरलेले आहे ते, गुरदे आणि काळजावरील पडदा ही त्याला सादर केली;


शांत्यर्पणासाठी एकंदर चोवीस बैल, साठ मेंढे, साठ बकरे आणि वर्षावर्षाची नरजातीची साठ कोकरे होती. वेदीला तैलाभ्यंग झाल्यावर तिच्या समर्पणाचे हे अर्पण होते.


तू माझ्या अगोदर गिलगाल येथे जा; मग मी होमबली अर्पण करायला व शांत्यर्पणांचे यज्ञ करायला तुझ्याकडे येईन; तू सात दिवस माझी वाट पाहत राहा; मग मी तुझ्याकडे येऊन तुला काय करायचे हे दाखवीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan