Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 हे सर्व घेऊन अहरोनाच्या मुलांनी वेदीवर, विस्तवावर रचलेल्या लाकडांवरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 व या सर्वांचा अहरोनाच्या मुलांनी वेदीवरील विस्तवावर रचलेल्या लाकडावरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे परमेश्वरासाठी केलेले सुवासीक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 नंतर अहरोनाच्या पुत्रांनी जळत्या लाकडावर असलेल्या होमार्पणावरील वेदीवर त्याचे हवन करावे. हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 3:5
24 Iomraidhean Croise  

त्या दिवशी राजाने परमेश्वराच्या मंदिराच्या पुढल्या अंगणामध्ये एक स्थान पवित्र करून होमबली, अन्नबली आणि शांत्यर्पणाची चरबी ही तेथेच अर्पण केली, कारण परमेश्वरासमोर असलेल्या पितळेच्या वेदीवर त्यांचा समावेश होईना.


नंतर त्यांनी स्वत:साठी व याजकांसाठी तयारी केली, कारण अहरोनाचे वंशज जे याजक ते रात्र पडेपर्यंत होमबली व चरबी अर्पण करण्यात गुंतले होते; म्हणून लेव्यांनी स्वत:साठी व अहरोनवंशज ह्यांच्यासाठी तयारी केली.


त्याच्या आतड्यांवर असलेली सगळी चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्यांच्यावरील चरबी ही सर्व घेऊन त्यांचा वेदीवर होम करावा.


इस्राएल वंशज मला सोडून बहकून गेले तेव्हा लेवी याजकांपैकी सादोक वंशज ह्यांनी माझ्या पवित्रस्थानाची सेवाचाकरी केली, म्हणून ते माझ्यासमीप येऊन माझी सेवा करतील, माझ्यासमोर उभे राहतील व मला चरबी व रक्त अर्पण करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो;


तुम्ही मला अन्न, चरबी व रक्त अर्पण करताना मनाने व शरीरानेही बेसुंती अशा परक्या लोकांना माझ्या पवित्रस्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे. ह्याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यांमध्ये भर घातली आहे.


त्याची आतडी व पाय त्याने पाण्याने धुवावेत. मग याजकाने ह्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे; हे होमार्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


पंखांच्या मधोमध त्याने तो फाडावा, पण ते भाग वेगळे करू नयेत; मग याजकाने वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर त्याचा होम करावा; हे होमार्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


त्याची आतडी आणि पाय त्याने पाण्याने धुवावेत. मग याजकाने त्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे; ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


आणि ह्याचा याजकाने वेदीवर होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्यान्न होय.


दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही त्याने वेगळी करावीत.


आणि शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे ह्याचीही सर्व चरबी वेगळी काढून घ्यावी व ती परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून याजकाने तिचा वेदीवर होम करावा; याजकाने त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.


आणि शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि वेदीवर असलेल्या हव्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ तिचा होम करावा; ह्या प्रकारे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.


वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये; याजकाने त्याच्यावर रोज सकाळी लाकडे घालून तो पेटता ठेवावा आणि त्याच्यावर होमबली रचून शांत्यर्पणांच्या चरबीचा होम करावा.


परमेश्वर मोशेला म्हणाला,


मग त्याने अन्नार्पण जवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन त्याचा वेदीवर होम केला; सकाळच्या होमार्पणासह हेही अर्पण करण्यात आले.


तू परमेश्वराप्रीत्यर्थ होमबली अथवा नवस फेडण्यासाठी यज्ञ किंवा शांत्यर्पणाचा यज्ञ म्हणून गोर्‍हा अर्पण करशील,


पण गाईचा प्रथमवत्स किंवा मेंढीचा प्रथमवत्स किंवा बकरीचा प्रथमवत्स खंड घेऊन सोडून देऊ नये, ते पवित्र आहेत म्हणून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडावे आणि त्यांच्या चरबीचा परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होम करावा.


प्रत्येक गोर्‍ह्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले तीन दशमांश एफा सपीठ, आणि प्रत्येक मेंढ्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ,


आणखी तू त्यांना सांग, परमेश्वराप्रीत्यर्थ जे हव्य तुम्ही अर्पायचे ते हे : नित्य होमार्पणासाठी रोज एकेक वर्षाची दोन दोषहीन नरजातीची कोकरे.


तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan