Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आणि ह्याचा याजकाने वेदीवर होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्यान्न होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग याजकाने त्या सर्वाचा वेदीवर होम करावा; हे शांत्यर्पण अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 याहवेहसाठी अन्नार्पण म्हणून याजक या सर्वाचे वेदीवर हवन करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 3:11
17 Iomraidhean Croise  

मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे; माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्या आत वितळले आहे.


तुम्ही मला अन्न, चरबी व रक्त अर्पण करताना मनाने व शरीरानेही बेसुंती अशा परक्या लोकांना माझ्या पवित्रस्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे. ह्याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यांमध्ये भर घातली आहे.


“अहरोनाला असे सांग की, पुढील पिढ्यांमध्ये तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग निघाले तर त्याने आपल्या देवाप्रीत्यर्थ अन्न अर्पण करण्यासाठी जवळ येऊ नये.


त्यांनी आपल्या देवाप्रीत्यर्थ पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये; ते परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणजे आपल्या देवाप्रीत्यर्थ अन्न अर्पण करीत असतात; म्हणून त्यांनी पवित्र राहावे.


तू त्याला पवित्र मानावे कारण तो तुझ्या देवासाठी अन्न अर्पण करतो; त्याला तू पवित्र लेखावे, कारण तुम्हांला पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे.


ह्यांतील कोणतेही प्राणी परक्याच्या हातून घेऊन तुम्ही आपल्या देवासाठी अन्न म्हणून अर्पण करू नयेत; कारण ते सव्यंग व सदोष आहेत, म्हणून ते तुमच्याप्रीत्यर्थ स्वीकारले जाणार नाहीत.”


आणि याजकाने वेदीवर त्यांचा होम करावा. हे सुवासिक हव्यान्न होय; कारण चरबी म्हणून जेवढी असेल तेवढी परमेश्वराची आहे.


हे सर्व घेऊन अहरोनाच्या मुलांनी वेदीवर, विस्तवावर रचलेल्या लाकडांवरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


पण तुम्ही म्हणता, परमेश्वराचे मेज विटाळले आहे; त्याचे उत्पन्न, त्याचे अन्न हे तुच्छ आहे; अशाने तुम्ही माझ्या नावाची अप्रतिष्ठा करता.


तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर चढवता. तरी तुम्ही विचारता, ‘आम्ही कोणत्या प्रकारे तुला विटाळले?’ तुम्ही म्हणता, ‘परमेश्वराचे मेज तुच्छ आहे;’ असे तुम्ही बोलता तेणेकरून तुम्ही ते विटाळवता.


“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, माझे अर्पण म्हणजे माझे सुवासिक हव्यान्न तुम्ही माझ्याप्रीत्यर्थ नियमित समयी अर्पण करण्यास जपा.


ह्या प्रकारे सात दिवसपर्यंत दररोज तुम्ही परमेश्वराला सुवासिक हव्यान्न अर्पावे; नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांशिवाय आणखी हेदेखील अर्पावे.


ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्वकाही कसे देणार नाही?


तुमच्याने प्रभूचा प्याला व भुतांचाही प्याला पिववत नाही; ‘प्रभूच्या मेजावरचे’ व भुतांच्याही मेजावरचे तुमच्याने खाववत नाही.


पाहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो माझ्याबरोबर जेवील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan