Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 27:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 तथापि कोणी आपल्या सर्वस्वापैकी जे काही परमेश्वराला समर्पित करील, मग तो मानवप्राणी असो, पशू असो किंवा त्याच्या वतनाचे शेत असो, ते विकू नये किंवा सोडवू नये; जे काही समर्पित केले असेल ते परमेश्वराप्रीत्यर्थ परमपवित्र समजावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 लोक परमेश्वरास काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे, पशू किंवा वतनांची शेते या प्रकारची असेल, ती देणगी परमेश्वराचीच आहे; ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 “ ‘एखादा मनुष्य आपल्याजवळ असलेले काहीही याहवेहला समर्पित करेल—मग ते एखादी व्यक्ती असो, पशू असो वा वतनाची जमीन असो—ते विकू नये किंवा खंडणी भरून सोडवूनही घेऊ नये; कारण समर्पित ते सर्व याहवेहसाठी परमपवित्र आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 27:28
35 Iomraidhean Croise  

परमेश्वराला केलेली अर्पणे व परमपवित्र वस्तू ह्यांची वाटणी करता यावी म्हणून इम्ना लेवी ह्याचा पुत्र कोरे जो पूर्ववेशीचा द्वारपाल होता त्याला स्वेच्छार्पणांची देखरेख करण्यासाठी नेमले होते.


परमेश्वराशिवाय दुसर्‍या दैवतांना बली अर्पण करणार्‍याचा अगदी संहार करावा.


अन्नार्पण, पापार्पण व दोषार्पण ही त्यांनी खावीत; इस्राएलांनी वाहिलेली हरएक वस्तू त्यांची व्हावी.


त्यांनी त्यातला काही विकू नये व त्याची अदलाबदल करू नये; तसेच देशातील प्रथमफळे इतरांकडे जाऊ देऊ नयेत; कारण तो भाग परमेश्वराला पवित्र आहे.


त्याने आपल्या देवाचे अन्न म्हणजे परमपवित्र-स्थानातील अन्न व पवित्र पदार्थ खावेत;


पण योबेलवर्षी ते शेत सुटेल तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे वतन होईल.


तो वत्स अशुद्ध पशूचा असला, तर तू ठरवलेल्या मोलात एक पंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा; पण तो सोडवत नसला, तर तू ठरवलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.


मानवप्राण्यांपैकी कोणाला वाहिले असेल, तर त्याला सोडवून घेता येणार नाही; त्याचा अवश्य वध करावा.


इस्राएल लोकांनी वाहिलेली प्रत्येक वस्तू तुझीच होय.


मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.


कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती.


जर कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करत नसेल, तर तो शापभ्रष्ट असो. माराना था.1


कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे.”


आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले; “जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे” असा शास्त्रलेख आहे;


म्हणून तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात चोहोकडल्या सर्व शत्रूंपासून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला विश्राम दिल्यावर अमालेकाची आठवण पृथ्वीतलावरून बुजवून टाक; विसरू नकोस.


कोणतीही अमंगळ वस्तू आपल्या घरी आणू नकोस, आणशील तर तूही तिच्याप्रमाणे नाशास पात्र ठरशील; तिचा अगदी वीट मान व तिचा पूर्णपणे अव्हेर कर, कारण ती नाशास पात्र ठरलेली वस्तू आहे.


त्या समयी यहोशवाने असा शाप दिला की, “जो कोणी यरीहो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.”


इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केला; यहूदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह ह्याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला.


यहोशवा म्हणाला, “तू आम्हांला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल.” मग सर्व इस्राएलांनी त्याला दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले.


तुम्ही करायची कामगिरी ही की, सर्व पुरुष आणि पुरुषांशी संबंध केलेल्या सर्व स्त्रिया ह्यांचा तुम्ही समूळ नाश करावा.”


त्यांना मुली देणे आपल्यापैकी कोणालाही शक्य नाही, कारण इस्राएल लोकांनी अशी प्रतिज्ञा केली आहे की, जो आपली मुलगी बन्यामिनाला देईल तो शापित होईल.”


मग इस्राएल लोक विचारपूस करू लागले, इस्राएलाच्या कोणत्याही वंशांपैकी परमेश्वरासमोर भरलेल्या मेळाव्याला आले नव्हते असे कोणी आहेत काय? कारण त्यांनी गंभीर प्रतिज्ञा केली होती, की, “जे मिस्पा येथे परमेश्वरासमोर येणार नाहीत त्यांना अवश्य जिवे मारावे.”


मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितले की, ‘जा, त्या पापी अमालेक्यांचा सर्वस्वी संहार कर, आणि ते नष्ट होत तोपर्यंत त्यांच्याशी युद्ध कर.’


तर आता जाऊन अमालेकास मार दे; त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गय करू नकोस; पुरुष, स्त्रिया, अर्भके, तान्ही बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे ह्या सर्वांचा संहार कर.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan