Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 27:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 पण नवस करणार्‍याने तो सोडवला तर तू ठरवलेल्या मोलात त्याने आणखी एक पंचमांश भर घालून तो सोडवावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 पण नवस करणाऱ्याला तो पशू सोडवावयाचा असला तर त्या किंमतीत आणखी एकपंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 परंतु जर त्या मालकाला तो पशू सोडवून घ्यावयाचा असेल, तर त्याच्या किमतीचा पाचवा भाग अधिक द्यावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 27:13
9 Iomraidhean Croise  

एखाद्या मनुष्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्शाइतकी भर त्यात घालून याजकाला तो पवित्र पदार्थ द्यावा.


त्याने तो बदलू नये म्हणजे वाइटाऐवजी चांगला किंवा चांगल्याऐवजी वाईट असा बदल त्याने करू नये; त्याने एका पशूबद्दल दुसरा दिलाच तर तो व त्याच्याबद्दल दिलेला असे दोन्ही पवित्र समजावेत.


त्या पशूचे गुणावगुण पाहून याजकाने त्याचे मोल ठरवावे; याजक म्हणून तू ठरवशील तितके त्याचे मोल समजावे.


एखाद्याने आपले घर परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र करून वाहिले तर याजकाने त्या घराचे गुणावगुण पाहून त्याचे मोल ठरवावे; याजक ठरवील तेवढे त्याचे मोल समजावे.


घर पवित्र करून वाहणारा मोल देऊन ते सोडवू पाहील तर तू ठरवलेल्या मोलात एक पंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे म्हणजे घर त्याचे होईल.


शेत पवित्र करून वाहणारा मोल देऊन आपले शेत सोडवू पाहील, तर तू ठरवलेल्या मोलात आणखी एक पंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे म्हणजे शेत कायमचे त्याचे होईल.


तो वत्स अशुद्ध पशूचा असला, तर तू ठरवलेल्या मोलात एक पंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा; पण तो सोडवत नसला, तर तू ठरवलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.


ज्या पवित्र वस्तूच्या बाबतीत त्याने पाप केले असेल तिची भरपाई त्याने करावी, आणि तिच्या मोलाचा आणखी पाचवा हिस्सा तिच्यात घालून ती याजकाला द्यावी; याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan