Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 26:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मी तुमच्या देशाला शांतता देईन व तुम्ही झोपलेले असाल तेव्हा तुम्हांला कोणाची भीती राहणार नाही; मी देशातून हिंस्र पशू नाहीसे करीन, आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हास कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करून येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 “ ‘मी तुम्हाला शांती देईन म्हणजे तुम्ही निर्धास्तपणे झोप घ्याल. उपद्रव देणारे पशू मी हाकलून देईन आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 26:6
43 Iomraidhean Croise  

त्याने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले व परमेश्वराचे नाव घेऊन त्यांना शाप दिला. तेव्हा वनातून दोन अस्वली बाहेर पडल्या व त्यांनी त्यांच्यातल्या बेचाळीस पोरांना फाडून टाकले.


पाहा, तुला एक पुत्र होईल तो शांतताप्रिय मनुष्य असेल. मी त्याला त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा देईन; त्याचे नाव शलमोन (शांतताप्रिय) असे होईल; त्याच्या कारकिर्दीत मी इस्राएलास शांती व स्वस्थता देईन.


अशा प्रकारे यहोशाफाटाच्या राज्यास स्वास्थ्य मिळाले; कारण त्याच्या देवाने त्याला चोहोकडून आराम दिला.


तू झोपी जाशील तेव्हा तुला कोणी भिवविणार नाही; बहुत लोक तुझे आर्जव करतील.


मैदानातल्या पाषाणाशीही तुझा स्नेह होईल; वनपशू तुझ्याशी सलोखा करतील.


आमचे बैल लादलेले असावेत; दरोडे, धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यांत नसावेत;


तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरतो; उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो;


परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य देईल; परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देईल.


मी अंग टाकले व झोपी गेलो; मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे.


मी स्वस्थपणे पडून लगेच झोपी जातो, कारण हे परमेश्वरा, तूच मला एकान्तात निर्भय ठेवतोस.


परमेश्वर देव जे काही बोलेल ते मी ऐकून घेईन; कारण तो आपल्या लोकांशी व आपल्या भक्तांशी क्षेमकुशलाचे भाषण करील; मात्र त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये.


मी त्यांना एका वर्षातच घालवून देईन असे नाही; तसे केले तर देश उजाड होईल आणि वनपशू फार होऊन तुला उपद्रव देतील.


तू निजतेवेळी भिणार नाहीस; तू निजशील आणि तुझी झोप सुखाची होईल,


तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवील; तू निजशील तेव्हा ते तुझे रक्षण करील; तू जागा होशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल.


तेथील मार्ग राजमार्ग होईल; त्याला पवित्र मार्ग म्हणतील; त्याने अपवित्र जन जाणार नाहीत; पण तो त्यांच्यासाठीच, परमेश्वराच्या लोकांसाठी होईल; त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत.


तेथे सिंह असणार नाहीत, हिंस्र पशूंचा तेथे रिघाव होणार नाही, तेथे ते आढळणार नाहीत; पण तेथे उद्धरलेले संचार करतील.


प्रकाशकर्ता, अंधाराचा उत्पन्नकर्ता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे; हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे.


त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


परमेश्वर म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; कारण पाहा, मी दूर देशातून तुझा उद्धार करीन, बंदिवासाच्या देशातून तुझ्या वंशजांचा उद्धार करीन. याकोब परत येईल, तो विश्राम पावेल व निर्भय होईल; त्याला कोणी धाक घालणार नाही.


ह्यानंतर मी जागा होऊन पाहतो तर ही माझी निद्रा मला गोड अशी भासली.


मी देशात हिंस्र पशू धाडून तो उद्ध्वस्त केला आणि त्या पशूमुळे कोणी त्यातून जातयेत नाही इतका निर्जन तो केला;


मी देशावर तलवार आणून म्हटले की, अगे तलवारी, देशावर फीर आणि तिने मनुष्य व पशू ह्यांचा संहार केला;


तर मग मी तलवार, दुष्काळ, हिंस्र पशू व मरी ही माझी चार्‍ही उग्र शासने यरुशलेमेतील मनुष्य व पशू ह्यांचा संहार करण्यास त्यावर पाठवीन, तेव्हा त्याचा निभाव कसा लागेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


मी क्षेमवचन देऊन त्यांच्याबरोबर करार करीन, देशातून दुष्ट पशू नाहीतसे करीन म्हणजे मग ते रानात निर्भय असे राहतील व जंगलात झोप घेतील.


मळ्यातील झाडे फलद्रूप होतील, भूमी आपला उपज देईल व ते आपल्या देशात निर्भयपणे वसतील; मी त्यांच्यावरील जोखडांची बंधने तोडून ज्यांनी त्यांच्याकडून दास्य करून घेतले त्यांच्या हातून त्यांना सोडवीन तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.


मी तुमच्यावर दुष्काळ व हिंस्र पशू पाठवीन; ते तुम्हांला नि:संतान करतील; मरी व रक्तपात तुमच्यावर येतील; मी तुमच्यावर तलवार आणीन; मी परमेश्वर हे म्हणालो आहे.”


त्या दिवशी इस्राएलांकरता मी वनपशू, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव ह्यांबरोबर करार करीन; देशातून धनुष्य, तलवार व युद्ध मोडून टाकीन व ते सुखासमाधानाने राहतील असे मी करीन.


मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन व तू परमेश्वराला ओळखशील.


ह्याकरता तुम्ही माझे विधी आचरावेत आणि माझे नियम लक्षपूर्वक पाळावेत; असे केल्याने तुम्ही देशात सुरक्षित राहाल.


देश आपला उपज देईल, तुम्ही पोटभर खाल आणि त्यात तुम्ही सुरक्षित राहाल.


मी तुमच्यावर वनपशू सोडीन आणि ते तुमची मुले उचलून नेतील, तुमच्या गुराढोरांचा नाश करतील, तुमची संख्या अगदी कमी करतील आणि त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील.


मी तुमच्यावर तलवार आणीन, ती करार मोडल्याचा बदला घेईल; तुम्ही आपापल्या नगरात जमा व्हाल, तेव्हा मी तुमच्यावर मरी पाठवीन; मी तुम्हांला तुमच्या शत्रूच्या स्वाधीन करीन.


तुम्ही आपल्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि ते तुमच्यापुढे तलवारीने पडतील.


ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांना घाबरवणार नाही; कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.


इस्राएलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखात कपटी जिव्हा आढळायची नाही; ते चरतील व विश्रांती मिळवतील, कोणी त्यांना भेडसावणार नाही.”


ह्या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी ह्या स्थळाला शांती देईन,”’ असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


एफ्राइमातले रथ, यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन; युद्धधनुष्य तोडून टाकण्यात येईल, तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल; त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून ते पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल.


मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.


हेरोद त्याला बाहेर आणणार होता त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोन शिपायांच्या मध्ये निजला होता, आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते.


ह्यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan